एक्स्प्लोर
सलमानसोबत लग्नाचा कसलाही विचार नाही : लूलिया
नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानचं लग्न चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कथित गर्लफ्रेंड लूलिया वंतूर आणि सलमान नोव्हेंबरमध्ये लग्न करणार, अशी चर्चा होती. आता त्यावर लूलियाने स्वतःच स्पष्टीकरण दिलं आहे.
सांस्कृतिक फरकामुळे आपला सलमानसोबत लग्नाचा कसलाही विचार नसल्याचं लूलियाने रोमन मीडियाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. भारतात सहा महिने राहिल्यानंतर लूलिया इटलीमध्ये पुन्हा परतली आहे.
भारतामध्ये आपल्या मनात नसलेल्या विषयावरही अनेक बातम्या छापल्या गेल्या, असं लूलिया म्हणाली. माझं या अगोदरही एक लग्न झालं आहे आणि पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिला आहे. मात्र सध्या दुसरं लग्न करण्याचा आपला विचार नाही, असं लूलियाने स्पष्ट केलं.
लूलिया गेल्या सहा महिन्यांपासून सलमानच्या कुटुंबियांसोबत राहत होती. 'सुलतान' आणि 'ट्युबलाईट'च्या सेटवरही सलमान आणि लूलिया आणि सलमान एकत्र दिसले होते. शिवाय अनेक पार्ट्यांमध्येही दोघे एकत्र दिसले. त्यामुळे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती.
दरम्यान सलमानने या विषयावर कधीही भाष्य केलं नाही. लूलियाने देखील भारतात असताना या विषयावर बोलणं टाळलं. मात्र इटलीमध्ये गेल्यानंतर लूलियाने यावर स्पष्टीकरण दिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement