एक्स्प्लोर
lakme fashion week to launch five new faces in 2016
मुंबई: लॅक्मे फॅशन वीकच्या (एलएफडब्ल्यू) आगामी सीझनमधील अंतिम फेरीत इलाना, गलैक्या, एलिना, पॉल आणि ब्रुना या पाच मॉडेल रॅम वॉक करणार आहेत. एलएफडब्ल्यू २४ ते २८ ऑगस्टदरम्यान होणार आहे.
लॅक्मे फॅशन वीक/फेस्टिव्हल २०१६साठी लॅक्मे आणि आयएमजा रिलायन्सने द सेंट रेजिस हॉटेलमध्ये नव्या मॉडेलचे ऑडिशन घेतले. या ऑडिशनच्या ज्यूरी म्हणून फॅशन डिझायनर अनीता डोंगरे, अभिनेत्री एवलिन शर्मा, फॅशन कोरिओग्राफर अनु आहुजा आणि लुबाना एडम्स, लॅक्मेचे हेड ऑफ इनोव्हेशन पोर्णिमा लांबा आणि आयएमजी रिलायन्सच्या उपाध्यक्षा जसप्रीत चंडोक यांनी काम पाहिले.
या ऑडिशनसाठी एकूण १०० तरुणी आल्या होत्या. त्यातून पाचच मॉडेलची निवड करण्यात आली.
लॅक्मे फॅशन वीक ज्या तरुणींना आंतरराष्ट्रीय रनवेमध्ये सहभागी व्हायचे आहे, अशांसाठी सुवर्णसंधी असते, असे जसप्रीत चंडोक यांनी सांगितले.
एलएफडब्ल्यूच्या ऑडिशनमुळे बॉलीवूड इंडस्ट्रीला दीपिका पादुकोण, कैटरीना आणि याना गुप्ता सारख्या सर्वेत्कृष्ठ अभिनेत्री मिळाल्या आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement