एक्स्प्लोर
बॉक्स ऑफिसवर 'जॉली LLB-2' ची धूम, चार दिवसात कमाई किती?
नवी दिल्ली: बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारच्या 'जॉली एलएलबी-2' ने सुरुवातीच्या चार दिवसात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून, गेल्या चार दिवसात 57.72 कोटींचा गल्ला गोळा केला आहे. मार्केट अॅनॅलिस्ट तरुण आदर्शने ट्वीट करुन याबाबतची माहिती दिलीय. तर वर्ल्डवाईल्ड कलेक्शनमध्ये हा सिनेमा शंभर कोटीच्या जवळ पोहचला आहे.
तरुण आदर्शने दिलेल्या आकडेवारीनुसार, या सिनेमाने शुक्रवारी 13.20 कोटी, दुसऱ्या दिवशी 17.31 कोटी, तिसऱ्या दिवशी 19.95 कोटी तर चौथ्या दिवशी 7.26 कोटी अशी एकूण 57.72 कोटींची कमाई केली आहे.
या कमाईने तीन दिवसात 50 कोटीचा कमाईचा टप्पा पार करणारा, हा 2017 सालातील तिसरा सिनेमा ठरला आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या रईसने तीन दिवसात 59 कोटी कमाई केली होती.
याशिवाय 'जॉली एलएलबी-2'ने वर्ल्डवाईल्ड चांगली कमाई केली असून, प्रदर्शनाच्या काही दिवसातच या सिनेमाने 97.53 कोटीची कमाई केली आहे. koimoi वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार या सिनेमाने 80.80 कोटीची ग्रॉस कमाई केली आहे.
संबंधित बातम्या: 'जॉली एलएलबी 2'ला दमदार ओपनिंग, पहिल्या दिवसाची कमाई...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement