(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'किसी का भाई किसी की जान' मधील पहिलं गाणं रिलीज; 'नय्यो लगदा' मध्ये सलमान आणि पूजाचा रोमँटिक अंदाज
'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटामधील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.'नय्यो लगदा' (Naiyo Lagda) असं या गाण्याचं नाव आहे.
Salman Khan: हिंदी चित्रपटसृष्टीतील भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. 'नय्यो लगदा' (Naiyo Lagda) या गाण्याचा टीझर सलमाननं सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर सलमानचे चाहते उत्सुकतेने या गाण्याची वाट बघत होते. आता हे पूर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.
'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील 'नय्यो लगदा' हे गाणे झी म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलं आहे. पलक मुच्छल आणि कमाल खान यांनी हे गाणं गायलं आहे. तर शब्बीर अहमद हे या गाण्याचे गीतकार आहेत. हिमेश रेशमियानं (Himesh Reshammiya) या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. 'नय्यो लगदा' या गाण्यातील सलमानच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
पाहा गाणं:
कधी रिलीज होणार किसी का भाई किसी की जान ?
सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. या चित्रपटामध्ये सलमान आणि पूजा यांच्याबरोबरच बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. पलक तिवारी, व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, राघव जुयाल हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत, असं म्हटलं जात आहे. 21 एप्रिल 2023 रोजी 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. किसी का भाई किसी की जान हा एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानसह साजिद नाडियाडवालाने केली आहे. या चित्रपटात पूजा आणि सलमानची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
सलमानचे आगामी चित्रपट
तसेच 'टायगर-3' (Tiger 3) या सलमानच्या आगामी चित्रपटांची वाट चाहते उत्सुकतेने पाहात आहेत. टायगर-3 या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. सलमान हा किक-2 आणि नो एंन्ट्री या सिक्वेलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :