Sunil Tatkare meet Modi- Shah : शाहांच्या भेटीनंतर तटकरेंनी मोदींची भेट घेतली
Sunil Tatkare meet Modi- Shah : शाहांच्या भेटीनंतर तटकरेंनी मोदींची भेट घेतली
महाराष्ट्रात पुढील सरकार भाजपच्याच नेतृत्वाखाली स्थापन होणार असल्याचा स्पष्ट निरोप भाजपच्या बड्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिला आहे. तसेच भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव निश्चित झाल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. मात्र भाजपकडून किंवा महायुतीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिल्याचं देखील सांगण्यात येत आहे. याचदरम्यान आज अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. सुनील तटकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढं मोठं यश महायुतीला मिळालं. अमित शाह यांचं सातत्याने मार्गदर्शन, सहकार्य आहे. आभार व्यक्त करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भेट झाली. पंतप्रधान मोदी यांची भेट झाली. त्यांचेही आभार व्यक्त केले आणि अभिनंदन केले. राज्यातील जनतेने जे यश आम्हाला दिले त्यात मोदींचा मोठा वाटा आहे, असं सुनील तटकरे म्हणाले. अमित शाह यांच्या भेटीबाबत सुनील तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. दिल्ली येथे महायुतीचे शिल्पकार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील महायुतीच्या महाविजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी प्रफुल पटेलही सोबत उपस्थित होते, अशं सुनील तटकरे म्हणाले. विशेष म्हणजे अमित शाह यांच्याभेटीआधी सुनील तटकरे यांनी देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगला या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भेटीगाठी सुरु केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d9ea52f1dec8b44d46b9fec7346122601739901030954977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d877e01e65ffa6ad741d16fb30b06fd71739886484727977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/317ce4712984847b3864b7b10235449d1739884286047977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhaji Maharaj Wikipedia | संभाजी महाराजांबाबत विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर, शिवप्रेमींमध्ये संताप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/2a247cc6697d594b2f91b2c8844dc83b1739879233835977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f65ce86b980e3b8da7e5336ea09ecb1a1739878805790977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)