(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 27 November 2024
दोन दिवसांचं मौन एकनाथ शिंदे सोडणार, दुपारी ३ वाजताच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष, श्रीकांत शिंदेही तातडीने मुंबईत दाखल
आधी मुख्यमंत्रीपद ठरेल, मग इतर मंत्रिपदं ठरतील, मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेलाही लवकरच उत्तर मिळेल, सत्तास्थापनेतल्या तिढ्याबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य
आधी मुख्यमंत्रीपद ठरेल, मग इतर मंत्रिपदं ठरतील, मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेलाही लवकरच उत्तर मिळेल, सत्तास्थापनेतल्या तिढ्याबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रीपदाची भाजपची ऑफर एकनाथ शिंदेंनी नाकारल्याची चर्चा, एका इंग्रजी दैनिकाची बातमी... उपमुख्यमंत्रीपदासाठी नवं नाव सुचवलं जाण्याची शक्यता
मुंबईत हॉटेलमध्ये थांबलेल्या सर्व आमदारांना मतदारसंघात परतण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश, आमदारांना मतदारसंघात जाऊन विजयी जल्लोष करण्याच्या सूचना
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अयोध्येत बॅनरबाजी! अयोध्यावासियों की पुकार, शिंदे मुख्यमंत्री फिर एक बार.. अशा घोषणांचे ठिकठिकाणी बॅनर..
आगामी निवडणुकासाठी ठाकरे गटाचा स्वबळाचा सूर, मविआसोबत निवडणूक नको, पराभूत उमेदवार आणि शिवसैनिकांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विनंती
जिंकलो हरलो तरी बॅलेट पेपरची मागणी, संजय राऊतांची ईव्हीएमवर टीका, निकालावर प्रश्नचिन्हं उपस्थित करणं १४ कोटी जनतेचा अपमान, बावनकुळेंचं मविआ नेत्यांना प्रत्युत्तर
घड्याळ चिन्हाबाबत अजित पवारांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळले नाहीत, शरद पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख, शरद पवारांचा फोटोही न वापरण्याच्या आदेशांची पायमल्ली केल्याचा आरोप
लाचखोरीच्या आरोपांबाबत अदानी समुहाचं बीएसई, एनएसईला स्पष्टीकरणाचं पत्र, अदानींनी लाच दिल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं नमूद, तर अदानींविरोधात थेट कोणताही आरोप नसल्याच ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगींचं विश्लेषण
प्रसिद्ध रॅपर बादशाहला बिश्नोई गँगची धमकी, चंदीगडमधील बादशाहच्या क्लबबाहेर बिश्नोई गँगकडून स्फोट
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रखडलेला दिवाळी बोनस तात्काळ देण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे परिवहन विभागाला आदेश.
आगामी वर्षात एप्रिल ते जूनदरम्यानच नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची शक्यता, ३१ मार्चची डेडलाईन मात्र हुकणार
राज्यभरात थंडीचा कडाका वाढला, मुंबईत १६ पूर्णांक ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर येत्या काही दिवसांत आणखी थंडी वाढण्याची शक्यता.