![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Shirsat on Eknath Shinde | न बोलता करेक्ट कार्यक्रम करण्यात एकनाथ शिंदे एक नंबरवर!
Sanjay Shirsat on Eknath Shinde | न बोलता करेक्ट कार्यक्रम करण्यात एकनाथ शिंदे एक नंबरवर!
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला घवघवीत यश मिळाले, त्यानंतर गेल्या अडीच वर्षांच्या प्रचंड कामाच्या बळावर पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असे दिसत असताना आता मात्र भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद मिळत असल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एबीपी माझाशी बोलताना मोठं विधान केलं आहे.
एकनाथ शिंदे यांची आज पत्रकार परिषद आहे. त्यांच्या मनात काही असेल ते मांडतील. एकनाथ शिंदेंच्या मनात काय आहे, हे आम्हालाही कळत नाही. न बोलता करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदे एक नंबरवर आहेत. शांतीत क्रांती ही एकनाथ शिंदेंची खासियत आहे. तसेच मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये एकनाथ शिंदे होते, आहेत आणि राहणार...असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे. जो पर्यंत नाव जाहीर होत नाही, तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही. 15 वर्षापासून मंत्री मंत्री म्हणून आमचं नाव आहे. मात्र मंत्री झालो नाही. राजकारणात काही फिक्स नसतं, असंही संजय शिरसाट यावेळी म्हणाले. भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाबाबत शब्द दिला होता, अशीही चर्चा सुरु आहे, असे संजय शिरसाट यांना विचारले असता, याबाबत मला काहीच कल्पना नाहीय, असं त्यांनी सांगितले.
![Sanjay Shirsat on Eknath Shinde | न बोलता करेक्ट कार्यक्रम करण्यात एकनाथ शिंदे एक नंबरवर!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/512775f816e5fd9a760c141fa758b0b91732698713015719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 27 November 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/18/23c772960618e6ac85f1cbad0686a920173192160875590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Uddhav Thackeray Group : बैठकीत EVM गोंधळासह पराभुतांचा मविआत न लढण्याचा सूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/6e25c5aeae4093bd7293a82b82ac1bdd1732694959485719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Eknath Shinde Banner Ayodhya : अयोध्यावासीयोंकी हैं पुकार, शिंदेजी बने मुख्यमंत्री फिर एकबार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/bc5c2cb43d84c52d646fc91aa24553471732693982615719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rahul Gandhi on Adani | लाखो कोटींचा आरोपी, गौतम अदानींना अटक करा; राहुल गांधींची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/38923ef27c554b428d21879d7598c2cf1732692586761719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)