Kishor Kadam: 'अजित पवारांना हतबल करत राहणं...'; किशोर कदम यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष
किशोर कदम (Kishor Kadam) यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
Kishor Kadam: सौमित्र म्हणजेच किशोर कदम (Kishor Kadam) हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी राजकारणाविषयी एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
किशोर कदम यांची पोस्ट
किशोर कदम यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिरलं, 'अजित पवारांना उपमुख्यमंत्री करत भिडे वृत्तीच्या माणसांना बोलतं करून अजित पवारांना हतबल करत राहणं हा राजकारणाचा भाग आहे. आपण सगळेच या राजकारणामुळे कोंडीत सापडलो आहोत. ता हा मुद्दा शिंदेजी आणि अजितजी कसे हाताळतात हा नसून माननीय फडणविसजी या दोघांची मजा बघत बसणार नाहीत अशी अपेक्षा आहे. तसं नसेल तर तात्काळ संभाजी नव्हे , मनोहर भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला अटक करावी अशी मी एक कलावंत म्हणून मागणी करीत आहे.'
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
किशोर कदम यांच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'कलाकारांनी अशी ठोस भूमिका घ्यायलाच हवी' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तुमच्या धाडसाचं कौतुक!'
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडमोडी घडत आहेत. या घडामोडींवर अनेक कलाकार भाष्ट करत आहेत. आता किशोर कदम यांनी शेअर केलेल्या या राजकारणाविषयीच्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
मनोहर भिडे म्हणजेच संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी या विषयी भाष्य केलं. त्यांनी मनोहर भिडे यांना अटक करण्याची मागणी केली.
किशोर कदम यांचे चित्रपट
किशोर कदम हे प्रसिद्ध कवी आणि अभिनेते आहेत. त्यांनी जोगवा, फँड्री या चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं. त्यांचा गारवा हा अल्बम लोकप्रिय ठरला. भारत एक खोज, असंभव, काय घडलं त्या रात्री या मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केलं. गेल्यावर्षी रिलीज झालेल्या झुंड या हिंदी चित्रपटामध्ये देखील किशोर कदम यांनी काम केलं आहे. या चित्रपटामधील त्यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. किशोर कदम हे त्यांच्या अभिनयानं आणि कवितांनी प्रेक्षकांची मनं जिंकत असतात.
संबंधित बातम्या