Kartik Aaryan: कार्तिक आर्यननं मुंबईमध्ये घेतलं आलिशान घर; किंमत ऐकून व्हाल अवाक्!
कार्तिकनं (Kartik Aaryan) मुंबईमध्ये एक आलिशन घर घेतलं आहे. या घराची किंमत किती आहे? याबाबत जाणून घेऊयात...
Kartik Aaryan Buys Luxury Apartment: अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. कार्तिकचा ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सध्या कार्तिक हा त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कार्तिकनं मुंबईमध्ये एक आलिशन घर घेतलं आहे. या घराची किंमत किती आहे? याबाबत जाणून घेऊयात...
कार्तिक आर्यनने जुहू येथील एका हाउसिंग सोसायटीमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. एका रिपोर्टनुसार, 17.50 कोटी रुपयांना हे घर कार्तिकनं खरेदी केलं आहे. या घराचा एरिया 1916 स्क्वेअर फुट असून हे घर हाउसिंग सोसायटीमधील सिद्धी विनायक नावाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आहे.
कार्तिक आर्यनने जुहू तारा रोड येथील प्रनेता अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये असणारा शाहिद कपूरचा फ्लॅट भाड्याने घेतला होता.या फ्लॅटचा एरिया 3 हजार 681 स्क्वेअर फूट होता. कार्तिक या घराचे भाडे 7.5 लाख रुपये देत होता. 2019 मध्ये कार्तिकने वर्सोव्यातील यारी रोडवरील राजकिरण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 1.60 कोटी रुपयांना एक घर विकत घेतले होते.
View this post on Instagram
कार्तिकचे चित्रपट
कार्तिकचा काही दिवसांपूर्वी शेहजादा हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण सध्या कार्तिकचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कार्तिक आर्यनच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणीनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. भूल भुलैया-2 या चित्रपटानंतर नंतर कार्तिक आणि कियारा यांची जोडी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत.
आता कार्तिकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. कार्तिकच्या लव्ह आज कल, प्यार का पंचनामा, सोनू की टीटू की स्विटी आणि लुका छुप्पी या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली.
इतर महत्वाच्या बातम्या: