Kartik Aaryan: कार्तिक आर्यननं इकोनॉमी क्लासमधून केला प्रवास; व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
नुकताच कार्तिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे सध्या कार्तिक चर्चेत आहे.
Kartik Aaryan Travelled In Economy Class: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कार्तिक हा या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे.नुकताच कार्तिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे सध्या कार्तिक चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसले की, कार्तिक हा विमानाच्या इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करत आहे. कार्तिकच्या या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.
काही दिवसांपूर्वी सारा अली खान, श्रद्धा कपूर या अभिनेत्री रिक्षामधून प्रवास करताना दिसल्या. आता कार्तिकनं फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासमधून प्रवास केल्यानं अमेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कार्तिकचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
कार्तिकच्या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हा चित्रपट प्रमोट करायचा नवा ट्रेंड आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'त्याचा नवा चित्रपट रिलीज होतोय कदाचित'. तर काही नेटकऱ्यांनी त्या व्हिडीओला कमेंट करुन कार्तिकचं कौतुक देखील केलं आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
कार्तिक आर्यनच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणीनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 29 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भूल भुलैया-2 या चित्रपटानंतर नंतर कार्तिक आणि कियारा यांची जोडी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
कार्तिकचा काही दिवसांपूर्वी शेहजादा हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. तर कियाराचा जुग जुग जियो हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. आता कार्तिक आणि कियारा यांच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? या प्रश्नाचे उत्तर लवकरच चाहत्यांना मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: