एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दबंग 3 मध्ये सलमानसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री
बॉलीवूडचा लाडका सल्लू भाई लवकरच 'चुलबूल पांडे'च्या रुपात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. सलमान खान पुढील वर्षी 'दबंग 3'च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे.
मुंबई : बॉलीवूडचा लाडका सल्लू भाई लवकरच 'चुलबूल पांडे'च्या रुपात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. सलमान खान पुढील वर्षी 'दबंग 3'च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. 'दबंग' आणि 'दबंग 2' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान 'दबंग'च्या फ्रेन्जायझीमधील तिसरा भाग घेऊन येत आहे.
'दबंग' आणि 'दबंग 2' प्रमाणे 'दबंग 3' मध्येदेखील सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत असेल, हे काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. या चित्रपटात सोनाक्षी एकटीच नसेल, तर सोनाक्षीसोबत बॉलिवूडची लाडकी बेबो म्हणजेच अभिनेत्री करिना कपूरसुद्धा या झळकणार असल्याचे वृत्त मिळाले आहे.
'दबंग'च्या दुसऱ्या भागात करिना 'फेव्हिकोल से' या आयटम साँगमध्ये पाहायला मिळाली होती. हे आयटम सॉन्ग खूप गाजले. त्यानंतर आता चित्रपटाच्या तिसऱ्या भागात करिना पुन्हा एकदा आयटम सॉन्ग करणार आहे. काही इंग्रजी वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटात करिनाची एक भूमिका असणार आहे.
संबधित बातमी : सलमान खान दबंग-3 मधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement