Hindutva Motion Poster : 'हिन्दुत्व'चे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' दिवशी चित्रपट होणार रिलीज
मोशन पोस्टरमध्ये आशिष शर्मा, अंकित राज आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सोनारिका भदोरिया यांचा फर्स्ट लूक दिसत आहे.
Hindutva Motion Poster : हिंदी चित्रपटसृष्टीत दिलवाले आणि दिलजले सारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणारे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण राजदान (Karan Razdan) हे आता चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. करण यांनी दिग्दर्शित केलेला 'हिन्दुत्व चॅप्टर वन - मैं हिंदू हूं' (Hindutva ) या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये आशिष शर्मा, अंकित राज आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सोनारिका भदोरिया यांचा फर्स्ट लूक दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून करण राजदान यांचा हिन्दुत्व हा चित्रपट चर्चेत आहे. यापूर्वी हिन्दुत्व या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. ज्यामध्ये चित्रपटाचा मुख्य अभिनेता आशिष शर्मा शंख वाजवताना दिसला होता. आता हिन्दुत्वच्या नव्या मोशन पोस्टरवर, अंकित राज आणि सोनारिका भदोरिया यांची झलक पाहायला मिळत आहे. करण राजदान यांचा हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. आशिष शर्मानं हिन्दुत्व या चित्रपटाचा नवा मोशन पोस्टर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले, 'हिंदुत्व म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणारा प्रवास, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे म्हणजे हिंदुत्व' या चित्रपटाचे शूटिंग गेल्या वर्षी पूर्ण झाले होते.
पाहा मोशन पोस्टर:
View this post on Instagram
हिन्दुत्व चित्रपटाचा मोशन पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. दिग्दर्शक करण राजदान यांच्या या चित्रपटाची त्यांचे आतुरतेने वाट पाहत आहे. आशिष शर्मा स्टारर हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: