Shehnaaz Gill : शहनाज गिल ‘लालबागच्या राजा’च्या चरणी नतमस्तक, ‘या’ रुपात मिळाली सिद्धार्थ शुक्लाची साथ! पाहा व्हिडीओ...
Shehnaaz Gill : अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिने नुकतेच ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेतले.
Shehnaaz Gill : अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिने नुकतेच ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेतले. गणेशोत्सवाचा निमित्ताने सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण बाप्पाच्या दर्शनासाठी लालबागमध्ये हजेरी लावत आहेत. शहनाज गिल आणि तिचा भाऊ शाहबाज (Shahbaaz Gill) यांनीही सोमवारी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी लालबागमध्ये हजेरी लावली. यावेळी शहनाजने पिवळ्या रंगाचा सूट परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. विशेष म्हणजे यावेळी शहनाज आणि शाहबाजसोबत सिद्धार्थ शुक्लाही या ठिकाणी एका अनोख्या रुपात हजर होता.
सिद्धार्थ शुक्ला भलेही या जगात नसेल, पण शहनाजच्या भावाने त्याच्या हातावर गोंदवलेल्या सिद्धार्थच्या चेहऱ्याच्या टॅटूच्या माध्यमातून तो नेहमी दोघांसोबत असेल. शहनाज आणि शाहबाज लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते. मात्र, सर्वांची नजर सिद्धार्थ शुक्लाच्या टॅटूवर होती.
पाहा व्हिडीओ :
अभिनेत्री शहनाज गिल रात्री उशीरा बाप्पाच्या दर्शनासाठी लालबागला पोहोचली होती. रात्रीच्या वेळी दर्शनासाठी रांगेत कमी गर्दी असते. अशावेळी शहनाजदेखील भक्तांच्या रांगेत उभी असलेली दिसली. गणपती बाप्पाच्या भक्तांच्या रांगेत उभी असलेल्या शहनाजला पाहून पापराझींचे कॅमेरे देखील तिथे पोहोचले. अनवाणी पायाने बाप्पाच्या दर्शनासाठी शहनाज भक्तांच्या रांगेत तिच्या नंबरची वाट पाहत उभी होती. यावेळी शहनाज गिल एकटी नव्हती तर, तिचा भाऊ शाहबाजही तिच्यासोबत होता.
शहनाज आपल्या भावाचा हात पकडून रांगेत उभी होती. तिच्या भावाच्या त्याच हातावर सिद्धार्थचा टॅटू होता. त्यामुळे सिद्धार्थ आज या जगात नसला तरी, शहनाज आजही त्याच्या आठवणींसोबत आयुष्य जगत आहे. तिने ज्या प्रकारे भावाचा हात धरला होता, त्यावरून ती सिद्धार्थ नेहमी आपल्यासोबतच असल्याचे सांगत होती.
'किसी का भाई किसी की जान'मध्ये झळकणार अभिनेत्री!
अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. शहनाज सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात झळकणार आहे. नुकतीच शहनाज संजय दत्तसोबत अमेरिका दौऱ्यावर गेली होती. शहनाज गिलने 'बिग बॉस 13' मधून चाहत्यांच्या मनावर वर्चस्व गाजवले आहे. या शोमध्ये सिद्धार्थ शुक्लासोबत मैत्री झाल्यानंतर, ती त्याच्या खूप जवळ आली. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूच्या वेळीही शहनाज गिल त्याच्यासोबत होती. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्याने ती पार कोलमडून गेली होती. मात्र, आता स्वतःला सावरत ती पुन्हा एकदा पडद्यावर परतणार आहे.
वाचा इतर बातम्या