एक्स्प्लोर

Kantara : 'चित्रपट पाहताना अंगावर शहारे आले’; ‘थलायवा’ रजनीकांतकडून ‘कांतारा’चं कौतुक!

Kantara : रजनीकांत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ‘कांतारा’ चित्रपटाचे मुख्य अभिनेते आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Kantara : साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी नुकतेच ‘कांतारा’ (kantara) चित्रपटाचे कौतुक केले आहे. रजनीकांत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या चित्रपटाचे मुख्य अभिनेते आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. रजनीकांत यांनी ‘कांतारा’ चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट उदाहरण म्हटले आहे. ‘कांतारा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. नुकताच ‘कांतारा’ हा IMDb वर सर्वोत्तम रेटिंग मिळवणारा भारतीय चित्रपट बनला आहे.

रजनीकांत यांनी नुकतेच एक ट्विट करून चित्रपटाचे कौतुक करताना लिहिले की, ‘ज्ञात गोष्टींपेक्षा अज्ञात गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत, हे होमबेलच्या ‘कांतारा’पेक्षा चांगलं कोणीही सांगू शकलं नसतं. हा चित्रपट पाहताना अंगावर अक्षरश: शहारे आले. तुमच्या या अचाट लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाला आमचा सलाम. या चित्रपटाच्या संपूर्ण स्टार कास्ट आणि क्रूचे अभिनंदन!’

पाहा पोस्ट :

चित्रपटाचे यश पाहून निर्मात्यांनी हा चित्रपट इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे हिंदी, तमिळ आणि तेलुगू व्हर्जन देखील थिएटरमध्ये रिलीज झाले आहे. तर, IMDbवरही चित्रपटाने चांगले रेटिंग मिळवले आहे. कन्नड भाषेतील चित्रपट ‘कांतारा’ सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. आता हा चित्रपट IMDb वर सर्वोत्तम रेटिंग मिळवणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने IMDb वर 9.5 रेटिंग मिळवून विक्रम रचला आहे. यापूर्वी हा विक्रम ‘KGF 2’च्या नावावर होता.

हिंदी व्हर्जनलाही मिळतेय जोरदार पसंती

अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने हिंदीतही जबरदस्त कमाई केली आहे. आधी हा चित्रपट फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता, पण नंतर चित्रपटाला मिळालेले अफाट यश पाहून निर्मात्यांनी तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्येही त्याचे डबिंग केले. इतर भाषांमध्ये रिलीज झाल्यानंतर ‘कांतारा’च्या कमाईत वाढ झाली आहे. चित्रपटाची कन्नड आवृत्ती ब्लॉकबस्टर ठरली आणि आता इतर भाषांमध्येही या चित्रपटाने आपली चुणूक दाखवली आहे.

'कांतारा' हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर आहे, ज्यामध्ये ऋषभ शेट्टीने लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय केला आहे. 30 सप्टेंबर रोजी रिलीज झाल्यापासून,  या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. 'कांतारा'मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Kantara Movie: 'अंगावर शहारे आले'; कांतारा चित्रपटाचं अल्लू अर्जुननं केलं कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget