(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nysa Devgn: न्यासा देवगणच्या ट्रान्सफॉर्मेशनवर काजोलनं सोडलं मौन; म्हणाली 'तिच्या वडिलांप्रमाणे ती...'
न्यासानं (nysa devgn) प्लास्टिक सर्जरी केली आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. आता या चर्चेवर काजोलनं मौन सोडलं आहे.
Nysa Devgn: अभिनेत्री काजोल (Kajol) आणि अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) यांची मुलगी न्यासा देवगण (nysa devgn) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो न्यासा सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी न्यासानं एका दिवाळी पार्टीला हजेरी लावली. या पार्टीमधील न्यासाच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. न्यासाचे या दिवाळी पार्टीमधील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोला आणि व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी न्यासाला ट्रोल केलं आहे. न्यासानं प्लास्टिक सर्जरी केली आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. आता न्यासा देवगणच्या ट्रान्सफॉर्मेशनवर काजोलनं मौन सोडलं आहे.
काजोलनं एका मुलाखती दरम्यान सांगितलं की, 'न्यासा इंटरनेटवर खूप अॅक्टिव असते. तिला सौंदर्य आणि आरोग्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहित आहेत. ती आठवड्यातून तीनदा फेस मास्क लावते आणि मलाही फेस मास्क लावायचा सल्ला ती देत असते. तिच्या वडिलांप्रमाणेच ती देखील फिटनेस फ्रीक आहे.'
'न्यासा ही हेल्दी डाएट फॉलो करते आणि ती रोज दोन ते तीन ग्लास गरम पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करते. मग ती उकडलेली अंडी, ताजी फळे हा नाश्ता करते.' असंही काजोलनं सांगितलं.
View this post on Instagram
न्यासा सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते. तिला 162 हजारपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. न्यासा अजय आणि काजोलसोबतचे फोटो देखील शेअर करते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Nysa Devgn: अजय देवगणच्या मुलीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले 'प्लास्टिक सर्जरी केली आहे का?'