Jitendra Kumar : 'कोटा फॅक्ट्री' फेम जीतू भैयाने घेतली 42 लाखांची कार; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Jitendra Kumar : लोकप्रिय अभिनेता जितेंद्र कुमारने 42 लाखांची नवीन कार खरेदी केली आहे.
![Jitendra Kumar : 'कोटा फॅक्ट्री' फेम जीतू भैयाने घेतली 42 लाखांची कार; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव Jitendra Kumar Kota Factory fame Jitendra Kumar bought a car worth Rs 42 lakh A shower of good wishes from the fans Jitendra Kumar : 'कोटा फॅक्ट्री' फेम जीतू भैयाने घेतली 42 लाखांची कार; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/a4a58f20270a18bd662fc435e4c5184b1657639609_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jitendra Kumar : अभिनेता जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) सध्या चर्चेत आहे. 'कोट्रा फॅक्ट्री', 'पंचायत' अशा अनेक गाजलेल्या वेबसीरिजमध्ये जितेंद्रने काम केलं आहे. या वेबसीरिजमुळे जितेंद्रला एक वेगळी ओळख मिळाली आहे. आता जितेंद्र पुन्हा चर्चेत आला आहे. जितेंद्रने 42 लाखांची एक महागडी कार खरेदी केली आहे.
जितेंद्रचा कार शोरुममधला कारसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जितेंद्रने खरेदी केलेल्या कारचे नाव मिनी कंटीमॅन आहे. त्यामुळे चाहते सध्या जितेंद्रला शुभेच्छा देत आहेत. 'कोटा फॅक्ट्री' या वेबसीरिजमध्ये जितेंद्रने जीतू भैयाचे पात्र साकारले होते. तसेच 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या सिनेमातदेखील जितेंद्र कुमार महत्त्वाच्या भूमिकेत होता. जितेंद्रची पंचायत ही वेबसीरिजदेखील प्रचंड गाजली होती. या वेबसीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.
View this post on Instagram
जितेंद्र कुमारचे आगामी प्रोजेक्ट
जितेंद्र कुमारचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. जितेंद्रचा 'जादूगर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे.
15 जुलैला नेटफ्लिक्सवर होणार रिलीज
'जादूगर' सिनेमात प्रेक्षकांना जितेंद्र कुमार आणि आरुषी शर्माची केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 15 जुलैला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 'जादूगर'ची घोषणा झाल्यापासून जितेंद्र कुमारचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा क्रीडाविषयक असला तरी प्रेक्षकांना सिनेमात रोमान्सदेखील पाहायला मिळणार आहे. जितेंद्र कुमारची 'पंचायत' ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. त्यामुळे प्रेक्षक आता 'जादूगर' सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या
Jaadugar Trailer : रोमान्स, थ्रिलर, नाट्य... जितेंद्र कुमारच्या 'जादूगर'चा ट्रेलर रिलीज
Jaadugar Trailer : रोमान्स, थ्रिलर, नाट्य... जितेंद्र कुमारच्या 'जादूगर'चा ट्रेलर रिलीज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)