(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jigara Box Office Collection : आलिया भटच्या 'जिगरा'मध्ये नाही दम, पहिल्या दिवशी खास कमाई नाही
Jigara Box Office Collection Day 1 : आलिया भटच्या 'जिगरा' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी काही खास कमाई करता आलेली नाही.
Jigara Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट हिचा 2024 मधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ॲक्शन थ्रिलर 'जिगरा' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 'जिगरा' चित्रपट 11 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे. पण, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करता आलेली नाही. आलिया भटच्या 'जिगरा' पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जादू करण्यात अयशस्वी ठरला आहे. चित्रपटाच्या दमदार ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता, ते पाहता जिगराला चांगली ओपनिंग मिळण्याच अंदाज लावला जात होता. मात्र, रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाचा जास्त गल्ला जमावता आलेला नाही.
आलिया भटच्या 'जिगरा'मध्ये नाही दम
जिगरा चित्रपटासाठी आलिया भट आणि वेदांग रैनासोबतच चित्रपटाच्या संपूर्ण टीमने जोरदार प्रमोशन केलं होतं. मात्र, हे प्रमोशन चाहत्यांना थिएटरपर्यंत आणण्यात फायदेशीर ठरलं नसल्याचं दिसत आहे. पहिल्या दिवशी जिगरा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर थंड सुरुवात झाली असली, तरी त्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची निर्मात्यांना अपेक्षा आहे. आलिया भट्टच्या 'जिगरा' चित्रपटाने राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळत आहे. दोन्ही चित्रपट पूर्णपणे वेगळ्या शैलीतील आहेत. वासन बाला दिग्दर्शित 'जिगरा' चित्रपटात सत्याची भूमिका करून आलियाने पहिल्यांदाच ॲक्शन करताना दिसली आहे.
जिगरा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक ओपनिंग
जिगरा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसाची कामगिरी निराशाजनक दिसत आहे. 'जिगरा' चित्रपटाला रिलीजच्या पहिल्या दिवशी फारशी पसंती मिळालेली नाही. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शोही रद्द करावे लागले. चित्रपटाच्या रिलीजच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'जिगरा' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 4.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हे सुरुवातीचे आकडे असून अधिकृत डेटा आल्यानंतर यामध्ये थोडे बदल होऊ शकतात.
दसऱ्याच्या सुट्टीमुळे 'जिगरा'च्या कमाईत वाढ होणार?
'जिगरा' चित्रपटाला रिलीजच्या पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे कमाई करता आलेली नाही. पण, आलिया भट्टच्या चित्रपटाला दसऱ्याच्या सुट्टीचा फायदा मिळून कमाई वाढेल, अशी आशा निर्मात्यांना आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्या 'वेट्टैयान' आणि राजकुमार राव आणि तृप्ती डिमरीचा 'विकी विद्या का वो व्हिडिओ' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर सुरु आहे. त्यामुळे 'जिगरा' चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाईही कमी झाली आहे. आता वीकेंडला हा चित्रपटाला किती गल्ला जमावता येतो, हे पाहावं लागणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :