एक्स्प्लोर
जयललितांचा माझ्यामुळे पराभव झाला होता, रजनीकांत यांचा खुलासा
चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांनी एक मोठा खुलासा केला. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा 1996 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्यामुळे पराभव झाला होता, असं रजनीकांत यांनी म्हटलं आहे.
जयललिता यांच्या शोकसभेत बोलताना रजनीकांत यांनी हा खुलासा केला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण जयललितांवर टीका केली होती. त्यामुळे आपल्या वक्तव्याचा एआयएडीएमके पक्षाला मोठा फटका बसला. त्यामुळे त्यांच्या परभवाला माझं वक्तव्यही जबाबदार होतं, असं रजनीकांत यांनी सांगितलं.
जयललिता यांना पुन्हा सत्ता दिली तर तामिळनाडूला देवही वाचवू शकणार नाही, असं वक्तव्य रजनीकांत यांनी प्रचारादरम्यान केलं होतं.
या प्रकारानंतर जयललिता यांना आपल्या मुलीच्या लग्नाचं निमंत्रण दिलं होतं. कसलीही अपेक्षा नसताना त्यांनी लग्नाला उपस्थिती लावल्याने आश्चर्याचा धक्का बसला होता, असा खुलासाही रजनीकांत यांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement