Jacqueline Fernandez : मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिननं नोंदवला जबाब; सुकेशबद्दल दिली माहिती
Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसने पटियाला कोर्टात कलम 164 अंतर्गत नवे खुलासे केले आहेत.
Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. या प्रकरणी पटियाला कोर्टातून तिला जामीन मिळाला असला तरी तिने शनिवारी नवीन खुलासा केला आहे. पण जॅकलिनने कोर्टात काय नवीन जबाब नोंदवला हे अद्याप समोर आलेलं नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिनने पटियाला कोर्टात कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवला आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिनला काही नवीन खुलासे करायचे होते. त्यामुळे ईडीने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जॅकलिनचा जबाब नोंदवला आहे.
जॅकलिन काय म्हणाली?
आर्थिक गुन्हे शाखेसमोर जॅकलिन नेमकं काय म्हणाली हे अद्याप समोर आलेलं नाही. सुकेश चंद्रशेखर विरोधात जॅकलिनने वक्तव्य केलं असल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे सुकेशचा बचाव करण्यासाठी जॅकलिनने काही वक्तव्य केलं असल्याचं म्हटलं जात आहे.
12 डिसेंबरला जॅकलिन कोर्टात हजर राहणार
मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची पुढची सुनावणी 12 डिसेंबरला होणार आहे. तिला 12 डिसेंबरपर्यंत कोर्टाने आरोप सिद्ध करण्यासाठी वेळ दिला आहे.
Jacqueline Fernandez arrives at Patiala House Court in Delhi in connection with the Rs 200 crores money laundering case involving conman Sukesh Chandrashekhar. pic.twitter.com/T8IjtaC9Bu
— ANI (@ANI) November 24, 2022
नेमकं प्रकरण काय?
200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. सुकेशवर अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलीनही आरोपी आढळली होती. यामध्ये अनेक साक्षीदार आणि पुराव्यांचा आधार घेण्यात आला. यानंतर न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. जॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी केल्यानंतर तिच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता.
जॅकलिन फर्नांडिला सुकेश चंद्रशेखरनं महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या. सुकेशवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. सुकेश चंद्रशेखरने 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख रूपये होती. तर प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली 36 लाख रूपयांची 4 पर्शियन मांजरं देखील जॅकलिनला देण्यात आली होती.
संबंधित बातम्या