एक्स्प्लोर

Jacqueline Fernandez: 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला कोर्टाकडून दिलासा! जामीन मंजूर

पटियाला कोर्टानं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez)  जामिन मंजूर केला आहे. दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जॅकलिनला जामीन मिळाला आहे.

Jacqueline Fernandezमनी लाँड्रिंग प्रकरणी पटियाला कोर्टानं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez)  जामीन मंजूर केला आहे. कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास जॅकलिनला मनाई करण्यात आली आहे. दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जॅकलिनला जामीन मिळाला आहे.  यापूर्वी जॅकलिनच्या जामिनावर 11 नोव्हेंबरला निर्णय होणार होता. मात्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज (15 नोव्हेंबर) पटियाला कोर्टामध्ये जॅकलिनच्या जामिना आर्जावर  सुनावणी झाली. 
 
जॅकलिनच्या जामीनाचा ईडीनं केला होता विरोध
जॅकलिनच्या जामीन अर्जाला विरोध करताना ईडीनं कोर्टात म्हटलं होतं की, 'तिनं देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला, तिने तपासकर्त्यांना सहकार्य केले नाही. आम्ही आयुष्यात कधी 50 लाख पाहिले नाहीत आणि जॅकलिननं फक्त मजा करण्यासाठी 7.14 कोटी खर्च केले. जॅकलिननं पळून जाण्यासाठी प्रत्येक मार्गाचा अवलंब केला कारण तिच्याकडे पैसे आहेत.'

जॅकलिनची याआधी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली होती. दरम्यान विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी ईडी आणि जॅकलिन यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अंतरिम जामिनावरील निकाल शुक्रवारपर्यंत राखून ठेवला होता. 

सुकेश चंद्रशेखरनं जॅकलिनला दिल्या होत्या महागड्या वस्तू

मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे सुकेश चंद्रशेखर हा सध्या अटकेत आहे.  सुकेशने 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. याप्रकरणात सर्वात आधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचंनाव समोर आले होते. त्यानंतर याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आले.

जॅकलिन फर्नांडिला सुकेश चंद्रशेखरनं महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या. सुकेशवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. सुकेश चंद्रशेखरने 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख रूपये होती. तर प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली 36 लाख रूपयांची 4 पर्शियन मांजरं देखील जॅकलिनला देण्यात आली होती. दिग्गज लोकांसह अनेकांची फसवणूक केल्याचा सुकेशवर आरोप आहे. 17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. 

जॅकलीनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तिचा 'रामसेतू' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या सिनेमात जॅकलीनसोबत नुसरत भरुचा आणि अक्षय कुमार यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Jacqueline Fernandez: 'जॅकलिनला अटक का केली नाही?' न्यायालयाचा ईडीला प्रश्न, वाचा आज कोर्टात काय घडलं

महत्त्वाच्या बातम्या

Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget