Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसच्या अटकेची शक्यता; 'भाईजान' मदतीला धावणार?
Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या अटकेची शक्यता वर्तवली जातं आहे. दरम्यान या संकटात तिला बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान मदत करणार का असा प्रश्न उपस्थित होतं आहे.
Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. रविवारी संध्याकाळी जॅकलीनला मुंबई विमानतळावर सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh ChandraShekhar) यांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये नाव आल्याने तिला देश सोडण्यापासून रोखण्यात आले. मुंबई विमानतळावर ईडीने तिला थांबवले होते. त्यानंतर आता 8 डिसेंबर रोजी दिल्लीत हजर राहण्याचे ईडीने तिला समन्स बजावले आहे. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी होणार आहे. सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.
दरम्यान तिला या गंभीर संकटातून बाहेर काढण्यास बॉलिवूडचा भाई म्हणजेच तिचा जवळचा मित्र आणि गुरू सलमान खान (Salman Khan) मदत करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान जॅकलीना सलमान खानची मदतही फायदेशीर ठरणार नसण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ''जॅकलीनला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर या प्रकरणात तिचं नाव आल्यानंतर आता तिच्या जवळच्या मित्रपरिवारानंही तिची साथ सोडली आहे. कठीण प्रसंगात तिचे सर्व जवळचे मित्र गायब झाले आहेत. तिच्या मित्रपरिवाराने तिच्याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे''
सुकेशने जॅकलीनला दिली कोटींची भेट
सुकेश चंद्रशेखर यांच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी होणार आहे. जॅकलिनला 8 डिसेंबर रोजी दिल्लीत हजर राहण्याचे ईडीने समन्स बजावले आहे. सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलं होतं. तल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Vicky Katrina Wedding : लग्नातील फुटेजसाठी विकी-कतरिनाला तब्बल 100 कोटींची ऑफर
- Katrina Kaif Video : विकी-कतरिनाच्या लग्नासोहळ्यामुळे मंदिराकडे जाणारा रस्ता ब्लॉक; स्थानिकांची तक्रार
- Malaika Arora and Arjun Kapoor Enjoying in Maldives: मलायका-अर्जुनचं स्विमिंग पूलमध्ये वर्क-आऊट; व्हिडीओ शेअर करत अर्जुनचं भन्नाट कॅप्शन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha