एक्स्प्लोर
खरंच सोनम कपूरला राष्ट्रगीत येत नाही?
मुंबई : सोशल मीडियावर एखादा नेता, अभिनेता/अभिनेत्री तसंच इतर व्यक्तींना ट्रोल करणं ही नवी गोष्ट नाही. आता बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ट्रोलर्सचा निशाणा बनली.
ट्रोलर्सने सोनम कपूरला असं काही ट्रोल केलं की, ती ट्वीट करुन म्हणाली, माझ्या लेखावर अशा कमालीच्या प्रतिक्रिया देण्यासाठी आभार ट्विटर आणि ट्रोलर्स, ज्यांनी अशा प्रतिक्रिया देऊन माझा मुद्दा योग्य असल्याचं सिद्ध केलं.
https://twitter.com/sonamakapoor/status/855404389728632832
सोनम कपूर ट्रोल का झाली?
हिंदुस्तान टाइम्सची #LetsTalkAboutTrolls सीरिजमध्ये ट्रोल्सबाबत मोहीम सुरु आहे. या सीरिजमध्ये शुक्रवारी सोनम कपूरचा लेख छापला होता.
या लेखाचा काही भाग ऑनलाईन शेअर केला होता. ज्यात सोनम कपूरच्या हवाल्याने लिहिलं होतं की, माझं माझ्या देशावर प्रेम आहे, पण मी तुमच्यापैकी काही लोकांसाठी कट्टर नाही. कारण मी प्रश्न विचारते किंवा टीका करते, यासाठी अँटी नॅशलन बनते. राष्ट्रगीत ऐका... लहानपणी ऐकलेलं ते वाक्य आठवा, 'हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई...''
काय आहे सत्य?
खरंतर, भारताचं राष्ट्रगीत 'जन-गण-मन'मध्ये 'हिंदू मुस्लिम सिख ईसाई' हे वाक्य नाही. हे वाक्य राष्ट्रगीतात कुठेच नाही. पण हे वाक्य तुम्ही शाळेमध्ये अनेकदा नक्कीच ऐकलं असेल.
परंतु सोनम कपूरचा पूर्ण वाचल्यास हे प्रकरण अगदी स्पष्ट होतं. सोनम लेखामध्ये लिहिते की, "पुन्हा एकदा राष्ट्रगीत ऐका. लहानपणी ऐकलेलं ते वाक्य आठवा- हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई.''
ऑनलाईन जो भाग शेअर केला आहे, त्यात आणि सोनमच्या लेखात फरक आहे. वर लिहिलेल्या दोन्ही वाक्यांमध्ये पूर्णविराम आहे, जो दोन्ही वाक्यांना वेगळं करतो. हा पूर्णविराम पाहणं आणि त्यानंतर थांबणं हे ट्रोलर्स विसरुन गेले.
सोनमला ट्रोल करता काय काय बोलले?
@coolfunnytshirt ने ट्वीट केलं की, "मला माहित नव्हतं की, जेव्हा सोनम कपूर लहान होते, तेव्हा आपलं राष्ट्रगीत अपडेट झालं होतं."
https://twitter.com/coolfunnytshirt/status/855433580264144896
ट्विटर हॅण्डल @the_sashiks ने ट्वीट केलं की, "दहशतवादी : कोणता शेवटचा प्रश्न
सोनम कपूर : आपल्या राष्ट्रगीतात द्रविडच का आहे. तेंडुलकर आणि गांगुली का नाही."
https://twitter.com/the_sashiks/status/855438957655478273
साग्निक मिश्र नावाचा ट्विपल लिहितो की, सोनम कपूरनुसार राष्ट्रगीत हनी सिंहने लिहिलं होतं.
https://twitter.com/Sangy_Sagnik/status/855426024653426688
याआधी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटलाही तिच्या सामान्य ज्ञानाबाबत सातत्याने ट्रोल केलं जात असे. आता ट्रोल होणाऱ्यांच्या यादीत सोनम कपूरचं नाव आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement