एक्स्प्लोर

कॅनडियन नागरिक अक्षय कुमारकडून राष्ट्रीय पुरस्कार परत घेतला जाणार?

परदेशी तंत्रज्ञ आणि कलाकारही भारतातील राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यास पात्र आहेत, अशी माहिती दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी ट्विटरवरुन दिली आहे

मुंबई : अक्षय कुमारने आपल्या कॅनडियन नागरिकत्वाबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर तो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी पात्र आहे की नाही, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अक्षयकडून राष्ट्रीय पुरस्कार परत घ्यावा का, असा सवाल काही नेटिझन्स विचारत आहेत. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रुस्तम' चित्रपटासाठी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अक्षयला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र हा पुरस्कार काढून घेण्याची मागणी काही जणांनी केली आहे. दरम्यान, परदेशी तंत्रज्ञ आणि कलाकारही भारतातील राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यास पात्र आहेत, अशी माहिती दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी ट्विटरवरुन दिली आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या नियमावलीचा फोटो ट्वीट करत ढोलकियांनी अक्षयची पाठराखण केली आहे. लेखक अपूर्व असरानी यांनी ट्विटरवरुन अक्षय पुरस्कारास पात्र नसल्यास काय पावलं उचलणार? असा सवाल विचारला होता. त्यावर्षी 'अलिगढ' चित्रपटात मुख्य भूमिका करणारा मनोज वाजपेयी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी प्रबळ दावेदार होता, याकडे असरानींनी लक्ष वेधलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अराजकीय मुलाखत घेतल्यानंतर अक्षय कुमार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. अक्षय कुमारने लोकसभा निवडणुकीसाठी मतदान न केल्यामुळे अनेक जणांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली होती. अक्षयने ट्विटरवरुन आपल्या नागरिकत्वाबाबत स्पष्टीकरण दिलं. 'माझ्या नागरिकत्वाविषयी अकारण होणाऱ्या चर्चेचं कारण मला समजतच नाही. माझ्याकडे कॅनडियन पासपोर्ट असल्याचं मी कधी नाकारलं नाही, लपवलंही नाही. मी गेल्या सात वर्षांत कॅनडाला गेलोही नाही' असंही अक्षय म्हणाला. 'मी भारतात काम करतो. भारतात सर्व कर भरतो. इतक्या वर्षांत मला भारताविषयीचं प्रेम सिद्ध करण्याची आवश्यकताच नव्हती. माझ्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन वारंवार वाद निर्माण करणं क्लेशदायी आहे. हा वैयक्तिक, कायदेशीर, अराजकीय मुद्दा असून त्याचा कोणावरही परिणाम होत नाही' असंही अक्षय पुढे म्हणाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahavikas Aghadi Meeting : विदर्भातील काही जागांवर महाविकास आघाडीची चर्चा रखडलीSamruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात?India vs Bangladesh, 2nd Test : 52 धावांची आघाडी, रोहित शर्माकडून डावाची घोषणाABP Majha Headlines : 5 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
Baramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
Embed widget