Indian Police Force: सिद्धार्थ मल्होत्रासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; फोटो शेअर करत म्हणाला, "चेस सीननंतर..."
Indian Police Force: इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थसोबत (Sidharth Malhotra) एक मराठमोळा अभिनेता झळकणार आहे.
Indian Police Force: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा लवकरच इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force) या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थसोबतच या वेब सीरिजमध्ये शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकरणार आहे. आता इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थसोबत एक मराठमोळा अभिनेता झळकणार आहे. कोणता मराठमोळा अभिनेता इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये काम करणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...
अभिनेता आदिश वैद्य हा इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच आदिशनं सिद्धार्थसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "या स्टारबॉयसोबत काम करताना खूप आनंद झाला. लांब धावण्याच्या चेस सीन नंतर क्लिक केलेला हा फोटो" आता इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये आदिशचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी आदिशनं दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला तिनं कॅप्शन लिहिलं, "आणि रोहित शेट्टी सर कॉप युनिव्हर्समधील माझ्या भागाचं शूटिंग संपलं!जेव्हा मी गोलमाल आणि सिंघम पाहिला, तेव्हा मी स्वप्न पाहिलं होतं की मी अशा दिग्दर्शकासोबत करेल की, ज्याला परिचयाची गरज नाही."
View this post on Instagram
रोहित शेट्टीनं दिग्दर्शित केलेल्या इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या वेब सीरिजच्या माध्यमातून सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी हे ओटीटीवर पदार्पण करत आहेत. इंडियन पोलीस फोर्स ही वेब सीरिज 19 जानेवारी 2024 रोजी प्राइम व्हिडीओ (Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: