एक्स्प्लोर
वर्षभरापूर्वी कमिटेड होते, आता सिंगल : प्रियंका चोप्रा
मी ढिगभर लोकांना भेटले. त्यांच्यासोबत बाहेर गेले. काहीजण माझ्या मागेही लागले होते. पण अजून माझं चित्त हरपलेलं नाही, असं प्रियंका सांगते.
मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्ये आपलं बस्तान बसवलं आहे. प्रियंकाच्या रिलेशनशीप स्टेटसची आतापर्यंत कधीच चर्चा झाली नाही, मात्र आता खुद्द तिनेच मौन सोडलं आहे. मी एका कमिटेड रिलेशनशीपमध्ये होते, मात्र गेल्या वर्षभरापासून मी सिंगल आहे, असं प्रियंकाने सांगितलं.
प्रियंकाला 2016 मध्ये एका मुलाखतीत लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. 'जेव्हा माझ्या बोटात अंगठी दिसेल, जी मला देण्यात आली असेल, तेव्ही मी जगाला ओरडून सांगेन. तोपर्यंत कोणीच माझ्यावर हक्क सांगू शकत नाही' असं मिष्किल उत्तर त्यावेळी प्रियंकाने दिलं होतं.
'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत पीसीने तिचं रिलेशनशीप स्टेटस जाहीर केलं आहे. 'मी सीरिअल मोनोगॅमिस्ट (जोडीदाराशी प्रामाणिक या अर्थी) मी गेल्या वर्षीपर्यंत एका कमिटेड रिलेशनशीपमध्ये होते, मात्र गेल्या वर्षभरापासून मी सिंगल आहे. मी ढिगभर लोकांना भेटले. त्यांच्यासोबत बाहेर गेले. काहीजण माझ्या मागेही लागले होते. पण अजून माझं चित्त हरपलेलं नाही, असं प्रियंका सांगते.
मी खूप मोठ्या कालावधीनंतर सिंगल आहे आणि माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. आणि मला हे आवडतंय, असं प्रियंका आनंदाने म्हणते.
'बाजीराव मस्तानी'नंतर प्रियंका बॉलिवूडमध्ये दिसली नाही. तिच्या काँटिको, बेवॉच या अमेरिकन सीरिज चांगल्याच गाजत आहेत. 'अ किड लाईक जेक' आणि 'इजन्ट इट रोमँटिक?' हे तिचे हॉलिवूडपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement