एक्स्प्लोर
Advertisement
मी तंबाखूची जाहिरात करत नाही, अजय देवगणचं स्पष्टीकरण
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या एका चाहत्याला कर्करोग झाला आहे. या चाहत्याने त्याच्या कर्करोगामागील कारण सांगताना म्हटले की, मी अजय देवगणचा फॅन आहे, अजय जाहिरात करत असलेला गुटखा मी अनेक वर्षांपासून खात होतो. त्यामुळेच मला कर्करोग झाला आहे.
मुंबई : बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या एका चाहत्याला कर्करोग झाला आहे. या चाहत्याने त्याच्या कर्करोगामागील कारण सांगताना म्हटले की, मी अजय देवगणचा फॅन आहे, अजय जाहिरात करत असलेला गुटखा मी अनेक वर्षांपासून खात होतो. त्यामुळेच मला कर्करोग झाला आहे. याप्रकरणी स्पष्टीकरण देताना अजय देवगण म्हणाला की, 'मी तंबाखूची किंवा गुटख्याची जाहिरात करत नाही". आगामी 'दे दे प्यार दे' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या अजयला माध्यमांच्या प्रतिनिधींना तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींविषयी विचारले असता अजयने त्याची बाजू मांडली.
अजय देवगण म्हणाला की, सर्वजण ज्या जाहिरातीबाबत बोलत आहेत, ती एक वेलचीची जाहिरात आहे. मी ही जाहिरात करण्यापूर्वी तंबाखूची किंवा गुटख्याची जाहिरात करणार नसल्याचा कंपनीशी करार केला आहे. मी जो करार केला आहे. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, त्या पदार्थामध्ये तंबाखू नसून केवळ वेलची आहे. परंतु तीच कंपनी दुसऱ्या पदार्थांची (तंबाखू किंवा गुटखा) विक्री करत असेल तर मला त्याची माहिती नाही.
नानकराम मीणा (40) या अजय देवगणच्या एका चाहत्याने अजयला 'तंबाखू आणि त्याच्या उत्पादनांची जाहिरात करणे सोडून दे', असे आवाहन केले होते. नानकराम हा राजस्थानमधील जयपूरमधला रहिवासी आहे. अजय देवगणची तंबाखू उत्पादनाची (गुटखा) जाहिरात पाहून नानकरामनेही गुटख्याचे सेवन सुरु केले. परंतु यामुळे नानकरामला कर्करोग झाला आहे. त्यामुळेच अजयने तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांची जाहिरात करु नये, असे नानकरामला वाटते.
नानकरामप्रमाणे अनेकांनी अजयची जाहिरात पाहून गुटख्याचे सेवन सुरु केले आहे. आपल्याप्रमाणे इतरांना कॅन्सर होऊ नये, यासाठी नानकरामने अजय देवगणला तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करु नये, अशी विनंती केली आहे.
नानकरामने जयपूरच्या सांगानेर, जगतपुरा आणि आसपासच्या परिसरात एक हजार पत्रके वाटली आणि भितींवर चिकटवली आहेत. यामध्ये तंबाखू आणि तंबाखूच्या पदार्थांचे सेवन केल्याने होणारे परिणाम, त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेली परिस्थिती याबाबतची माहिती दिली आहे. तसेच या पत्रकाद्वारे नानकराम यांनी अजय देवगणला तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची जाहीरात करु नको, असे आवाहनही केले आहे.
तंबाखूच्या जाहिराती करणे सोड, कॅन्सर पीडित चाहत्याचं अजय देवगणला साकडं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement