Hrithik Roshan : एक्स बायकोच्या बॉयफ्रेंडला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, हृतिकच्या कमेंटवर नेटकरी म्हणाले...
Hrithik Roshan : हृतिक रोशनने नुकतच त्याची एक्स बायको सुझैन खानच्या बॉयफ्रेंडला वाढदिवसााच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची ही कमेंट सध्या बरीच चर्चेत आलेली आहे.
Hrithik Roshan : घटस्फोटानंतरही दोन व्यक्तींमध्ये छान मैत्रीचं नातं राहू शकतं, हे बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. नुकतच हृतिक रोशनची एक्स बायको सुझैनच्या (Sussanne Khan) बॉयफ्रेंड अर्सलान गोनी (Arslan Goni) याचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सुझैनने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यावर हृतिक रोशननेही कमेंट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सध्या हृतिकची ही कमेंट बरीच चर्चेत आलेली आहे.
सुझैन खानने अर्सलान गोनीसोबत घालवलेल्या काही खास क्षणांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. तिने इंस्टाग्रामवर रोमँटिक फोटो आणि व्हिडिओंचा कोलाज शेअर केलं. त्यावर तिने त्याच्यासाठी खास मेसेजही लिहिला होता. तिच्या याच पोस्टवर हृतिकने कमेंट केली आहे. त्याच्या या कमेंटवर नेटकऱ्यांनीही कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
सुझैनच्या पोस्टवर हृतिकची कमेंट
सुझैनच्या या पोस्टवर हृतिकने कमेंट करत अर्सलानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.'हॅपी बर्थडे माय फ्रेंड.' असं म्हणून त्याने हार्ट इमोजीही टाकलं आहे. या कमेंटवर अर्सलानने त्याचे आभार मानले तर युजर्सनीही भरपूर कमेंट केल्यात. हृतिकसाठी एकाने कमेंट करत म्हटलं की, हे सगळं करायला खूप मोठं मन लागतं.
सुझैनची बॉयफ्रेंडसाठी खास पोस्ट
सुझैनने लिहिलं की, 'मला आयुष्यभर फक्त तू हवा आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह. तु मला या जगातली सगळ्यात आनंदी स्त्री बनवलं आहेस. तुझ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली वेळ आताच सुरु व्हावी. नेहमीच तुझ्यावर प्रेम करत राहिन...
हृतिकच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस
हृतिकच्या या पोस्टवर कमेंट्स करत म्हटलं की, तो तुझा सवत आहे, या गोष्टीसाठी खरंच खूप मोठं मन लागतं, सध्या हृतिकच्या या कमेंटचीच सोशल मीडियवर बरीच चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram