![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Brahmastra: ब्रह्मास्त्र-2 मध्ये साकारणार भूमिका? हृतिक म्हणाला, 'मी चित्रपटाशी जोडला गेलोय पण..'
अयान मुखर्जीच्या (Ayan Mukerji) ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अभिनेता हृतिक रोशन हा प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे.
![Brahmastra: ब्रह्मास्त्र-2 मध्ये साकारणार भूमिका? हृतिक म्हणाला, 'मी चित्रपटाशी जोडला गेलोय पण..' hrithik roshan teases appearance in brahmastra part 2 Brahmastra: ब्रह्मास्त्र-2 मध्ये साकारणार भूमिका? हृतिक म्हणाला, 'मी चित्रपटाशी जोडला गेलोय पण..'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/27/569d9478bfeead513edce87e2698c2cf1664255027077259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Brahmastra: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचा ‘ब्रह्मास्त्र’(Brahmastra) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'ब्रह्मास्त्र पार्ट 2: देव' (Brahmastra Part 2: Dev) असं ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं नाव असणार आहे. अयान मुखर्जीच्या (Ayan Mukerji) ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) हा प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. याबाबत हृतिकनं आता एका मुलाखतीमध्ये माहिती दिली आहे.
काय म्हणाला हृतिक?
ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या पहिल्या भागात रणबीरनं शिवा आणि आलियानं ईशा ही भूमिका साकारली आहे. आता आयानंच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात देव या भूमिकेची कथा दाखवण्यात येणार आहे. एका मुलाखतीमध्ये ह्रतिकला ब्रह्मास्त्र-2 चित्रपटातील भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत हृतिक म्हणाला की, या प्रश्नावर उत्तर देताना हृतिक म्हणाला की, 'मी या चित्रपटाशी जोडला गेलोय, पण त्याबद्दल अधिक आताच सांगता येणार नाही.' 2025 मध्ये ब्रह्मास्त्र-2 हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
ब्रह्मास्त्रसोबतच हृतिक रोशन हा नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटात देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना हृतिक म्हणाला, 'याबाबत मला माहित नाही, पण पुढचा प्रोजेक्ट फायटर हा असेल'
हृतिकचे आगामी चित्रपट
फायटर या चित्रपटात ह्रतिकसोबत दीपिका पादुकोण,अनिल कपूर हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद हे कराणार आहेत. हृतिकचा विक्रम वेधा हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. 'विक्रम वेधा' या सिनेमात हृतिक रोशन आणि सैफ अली खानसह राधिका आपटे आणि योगिता बिहानी, रोहित सराफदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 'विक्रम वेधा' हा सिनेमा 2017 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या एका तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. हृतिकच्या आगमी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)