Happy Birthday Nagarjuna : बालकलाकर म्हणून केली करिअरची सुरुवात, आता साऊथचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो नागार्जुन!
Nagarjuna Birthday : अभिनेता नागार्जुनने (Nagarjuna Akkineni) दाक्षिणात्य तसेच, हिंदी चित्रपट विश्वात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. आज (29 ऑगस्ट) नागार्जुन आपला वाढदिवस साजरा करत आहे.
Nagarjuna Birthday : अभिनेता नागार्जुनने (Nagarjuna Akkineni) दाक्षिणात्य तसेच, हिंदी चित्रपट विश्वात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. आज (29 ऑगस्ट) नागार्जुन आपला वाढदिवस साजरा करत आहे. नागार्जुन अक्किनेनी हे साऊथ इंडस्ट्रीमधलं मोठं नाव आहे. नागार्जुन यांचा जन्म 29 ऑगस्ट 1959 रोजी चेन्नई येथे झाला. एक चांगला अभिनेता असण्यासोबतच, नागार्जुन एक चित्रपट निर्माते आणि उद्योगपती देखील आहेत. त्यांचे वडील अक्किनेनी नागेश्वर देखील प्रसिद्ध अभिनेते होते. चित्रपट विश्वाची पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातील असल्याने नागार्जुन यांना सुरुवातीपासूनच मनोरंजन विश्वाची ओढ होती. अगदी लहान वयातच त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
नागार्जुन यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. नागार्जुनने दीर्घकाळ बालकलाकार म्हणून काम केले. बालकलाकार म्हणून त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. नागार्जुन अक्किनेनी यांनी ‘विक्रम’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यांचा हा चित्रपट 1986 मध्ये प्रदर्शित झाला होता. याच वर्षी नागार्जुन यांनी ‘कॅप्टन नागार्जुन’ आणि ‘अरण्यकांड’ या त्यांच्या दोन चित्रपटांमध्येही काम केले. या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. यानंतर नागार्जुनने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी एकापाठोपाठ अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
अभ्यासातही हुशार!
मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी असतानाही अभिनेत्याने अभिनयापेक्षा अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलरची पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण घेतले. उच्च शिक्षणासाठी नागार्जुन (Nagarjuna Akkineni) यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लुईझियाना, लाफायेटमध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांनी ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली.
दोन वेळा बांधली लग्नगाठ!
1984 मध्ये, अक्किनेनी नागार्जुनने चित्रपट निर्माते डी. रामनायडू यांची मुलगी लक्ष्मी दग्गुबतीशी विवाह केला, दोघांनाही नागा चैतन्य नावाचा मुलगा आहे. नागार्जुन आणि लक्ष्मीचे लग्न फार काळ टिकले नाही. तब्बल 6 वर्षांनी दोघांनी 1990 मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर नागार्जुनने अभिनेत्री अमला अक्किनेनीशी लग्न केले, दोघांनाही एक मुलगा अखिल अक्किनेनी आहे. नागार्जुन यांचे दोन्हीही मुलगे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन विश्वात सक्रिय झाले आहेत.
तब्बू अन् नागार्जुन यांच्या प्रेमाची चर्चा!
काही वर्षांपूर्वी नागार्जुन (Nagarjuna Akkineni) सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तब्बू यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. एका चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची भेट झाली होती. दरम्यान, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी नागार्जुनचे लग्न झाले होते. पण, तरीही दोघांचे अफेअर सुरूच होते. दोघेही जवळपास 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण, त्यांचे लग्न होऊ शकले नाही. नागार्जुन यांचे तब्बूवर प्रेम होते, पण त्यांना त्यांचे लग्नही मोडायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी तब्बूशी लग्न केले नाही आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.
हेही वाचा :