एक्स्प्लोर

Brahmastra Nagarjuna Look : ‘अंधकार भी थर थर कांपे’, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील नागार्जुनचा जबरदस्त लूक पाहिलात का?

Brahmastra Nagarjuna Look : 'ब्रह्मास्त्र' मधील सुपरस्टार नागार्जुनचा लूक नुकताच शेअर करण्यात आला असून, ही झलक पाहून चित्रपटात नक्कीच काहीतरी जबरदस्त पाहायला मिळणार आहे, असा अंदाज चाहते बांधत आहेत.

Brahmastra Nagarjuna Look : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) रिलीज होण्यापूर्वीच प्रचंड चर्चेत आहे. निर्माते सोशल मीडियावर चित्रपटाच्या स्टारकास्टचा फर्स्ट लूक शेअर करत आहेत. नुकताच अमिताभ बच्चन यांचा लूक समोर आला होता. आता निर्माता करण जोहरने या चित्रपटातील नागार्जुनचा (Nagarjun Akkineni) फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटात नागार्जुन एका जबरदस्त लूकमध्ये दिसला आहे. या चित्रपटातून नागार्जुन पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात दिसणार आहे.

'ब्रह्मास्त्र' मधील सुपरस्टार नागार्जुनचा लूक नुकताच शेअर करण्यात आला असून, ही झलक पाहून चित्रपटात नक्कीच काहीतरी जबरदस्त पाहायला मिळणार आहे, असा अंदाज चाहते बांधत आहेत. नागार्जुन मोठ्या गॅपनंतर हिंदी चित्रपटाचा भाग बनणार आहेत.

पाहा पोस्टर :

अयान मुखर्जीने 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर, करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आलिया-रणबीर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), मौनी रॉय (Mouni Roy), अक्किनेनी नागार्जुन (Nagarjun Akkineni) या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 9  सप्टेंबर 2022 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'ब्रह्मास्त्र'मध्ये होणार धमाका!

'ब्रह्मास्त्र' हा तीन भागांचा फँटसी चित्रपट आहे, ज्यामध्ये रणबीर ‘शिवा’च्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, आलिया भट्ट ‘ईशा’च्या भूमिकेत आहे, जी त्याची मैत्रीण आहे. अमिताभ बच्चन हे प्रोफेसर ‘अरविंद चतुर्वेदी’ आहेत आणि नागार्जुन पुरातत्वशास्त्रज्ञ झाले आहेत, त्यांचे नाव ‘अजय वशिष्ठ’ आहे. मौनीच्या पात्राचे नाव ‘दमयंती’ आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. अयान आणि त्याच्या टीमने 'ब्रह्मास्त्र' बनवण्यात अर्ध्या दशकाहून अधिक वेळ घालवला आहे.

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची घोषणा ऑक्टोबर 2017मध्ये झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2018मध्ये त्याचे शूटिंग सुरू झाले. याआधी जून आणि नंतर सप्टेंबर 2019 मध्ये या चित्रपटाचे शूटिंग वाराणसीमध्ये झाले होते. या चित्रपटाद्वारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

हेही वाचा :

Brahmastra : आलिया-रणबीरच्या 'ब्रम्हास्त्र'चा प्रदर्शनाआधी असाही विक्रम; रचला इतिहास

ब्रह्मास्त्रसाठी रणबीर कपूरने घेतले 25-30 कोटी, जाणून घ्या 'या' स्टार्सच्या मानधनाबद्दल!

Brahmastra : 'ब्रह्मास्त्र' मधील आलियाचा फर्स्ट लूक रिलीज; अयान मुखर्जीनं शेअर केला व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget