एक्स्प्लोर
'गलती सिर्फ तुम्हारी', जीएसटीवर सिनेमा
17 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होईल.
मुंबई : मोदी सरकारने 1 जुलै 2017 पासून जीएसटी ही नवी कर प्रणाली लागू केली. जीएसटीला कुणाचा विरोध आहे, तर कुणाचा पाठिंबा. देशातलं राजकारणही यावरुन तापलेलं आहे. अशातच आता जीएसटी नावाचा चक्क सिनेमा येत आहे.
बॉलिवूडने जीएसटीचा वापर सिनेमासाठी केल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच मर्सल या दाक्षिणात्य सिनेमात जीएसटीवर आधारित एक संवाद होता, ज्यावरुन प्रचंड वाद झाला. मात्र आता चक्क ‘गलती सिर्फ तुम्हारी’ अर्थात जीएसटी हा सिनेमा येत आहे.
सारिका एस सजोतने या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर सूर्यकांत त्यागी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 17 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होईल. या सिनेमाचं पोस्टरही रिलीज झालं आहे. मात्र सिनेमाची स्टोरी अजून समोर आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement