एक्स्प्लोर
जगातल्या टॉप 10 महागड्या अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमार, कॅप्टन अमेरिका, टॉम क्रुजलाही टाकले मागे
फोर्ब्स मासिकाने जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या 10 अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे. या टॉप 10 यादीत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा समावेश आहे.
लॉस एंजेलिस : फोर्ब्स मासिकाने जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या 10 अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे. या टॉप 10 यादीत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा समावेश आहे. अक्षयने या यादीत चौथा क्रमांक पटकावला आहे. फोर्ब्स डॉट कॉमच्या यादीनुसार अक्षयने गेल्या वर्षभरात 6.5 कोटी डॉलर्सची (467 कोटी 4 लाख रुपये) कमाई केली आहे.
फोर्ब्सच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत डब्ल्यू डब्ल्यू एफ स्टार 'द रॉक' म्हणजेच ड्वेन जॉनसन पहिल्या क्रमांकावर आहे. जून 2018 ते जून 2019 दरम्यान त्याने 8.94 कोटी डॉलर्सची (642 कोटी 36 लाख रुपये) कमाई केली आहे.
मार्वेलचा सुपहिरो 'थॉर' म्हणजेच ख्रिस हेम्सवर्थ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ख्रिसने 7.64 कोटी डॉलर्सची (548 कोटी 95 लाख रुपये) कमाई केली आहे.
थॉरनंतर मार्वेलचा सुपरहिरो आयर्नमॅनने (रॉबर्ट डाऊनी ज्युनियर) तिसरा क्रमांक पटकावला आहे. रॉबर्टने 6.6 कोटी डॉलर्सची (474 कोटी 22 लाख रुपये) कमाई केली आहे.
सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांची यादी
1. ड्वेन जॉनसन (द रॉक): 8.94 कोटी डॉलर्स
2. ख्रिस हेम्सवर्थ (थॉर): 7.64 कोटी डॉलर्स
3. रॉबर्ट डाऊनी ज्युनियर (आयर्नमॅन): 6.6 कोटी डॉलर्स
4. अक्षय कुमार : 6.5 कोटी डॉलर्स
5. जॅकी चॅन : 5.8 कोटी डॉलर्स
6. ब्रॅडली कूपर : 5.7 कोटी डॉलर्स
7. अॅडम सँडलर : 5.7 कोटी डॉलर्स
8. ख्रिस इवान्स (कॅप्टन अमेरिका): 4.35 कोटी डॉलर्स
9. पॉल रुड (अॅन्टमॅन) : 4.1 कोटी डॉलर्स
10. विल स्मिथ : 3.5 कोटी डॉलर्स
पूरग्रस्तांनो धीर सोडू नका, संयम बाळगा, अभिनेता अक्षय कुमारचा पूरग्रस्तांसाठी संदेश | एबीपी माझा
कॅनेडियन नागरिकत्त्वावर अक्षय कुमारचं काय म्हणणं आहे?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बुलढाणा
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement