एक्स्प्लोर
अटल बिहारी वाजपेयींवर सिनेमा, वाजपेयींच्या भूमिकेत कोण?
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा राजकीय प्रवास मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकची घोषणा नुकतीच झाली आहे. या सिनेमात नवाजुद्दिन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारणार आहेत.
बाळासाहेबांपाठोपाठ देशातील आणखी एका राजकीय व्यक्तीवर सिनेमा येणार आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा राजकीय प्रवास मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘युगपुरुष अटल’ असं या सिनेमाचं नाव असेल.
अटल बिहारी वाजपेयी यांचा कालच 93 वा वाढदिवस साजरा झाला. या निमित्ताने स्पेक्ट्रम मूव्हीजने ही घोषणा केली.
मयांक पी श्रीवास्तव हे या सिनेमाचं दिग्दर्शन, तर रंजीत शर्मा हे निर्मिती करणार आहेत.
“हा सिनेमा अटलजींच्या आयुष्याच्या सर्व पैलूंना स्पर्श करेल. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा असेल. ज्यामध्ये अटलजींचं बालपण ते आतापर्यंतचं आयुष्य दाखवलं जाईल”, असं दिग्दर्शक म्हणाले.
तर मी अटलजींसोबत काम केलं आहे. त्यांच्या आयुष्यावर सिनेमा करण्याचं माझं स्वप्न होतं. ते आता सत्यात उतरताना दिसत आहे, असं निर्माता रंजीत शर्मा म्हणाले.
या सिनेमाला बप्पी लहरी संगीत देणार आहेत. तर गाण्यांमध्ये अटलजींच्या कवितांचा समावेश असेल.
अटलजींचं व्यक्तित्व सिनेकहाणीत बांधणं अवघड आहे, असं सिनेलेखक बसंत कुमार यांनी सांगितलं.
दरम्यान, या सिनेमात अटल बिहारी वाजपेयींची भूमिका कोण साकारणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
हा सिनेमा वाजपेयींच्या 94 व्या वाढदिनी म्हणजेच 25 डिसेंबर 2018 रोजी रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या
VIDEO : ...तेव्हा बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे माझे प्राण वाचले : बिग बी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
क्राईम
Advertisement