Father's Day 2023 : 'बाप' माणसं! बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील बाप-लेकाच्या प्रसिद्ध जोड्या
18 जून रोजी फादर्स-डे (Father's Day) साजरा केला जाणार आहे. यानिमित्तानं जाणून घेऊताय बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध बाप-लेकांच्या जोड्या...
Father's Day 2023 : 'फादर्स डे' (Father's Day) हा दिवस वडील आणि मुलांच्या नात्यासाठी खास असतो. यादिवशी वडिलांवरचं प्रेम मुलं व्यक्त करतात. जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स-डे साजरा केला जातो. यावर्षी 18 जून रोजी फादर्स-डे साजरा केला जाणार आहे. यानिमित्तानं जाणून घेऊताय बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध बाप-लेकांच्या जोड्या...
आर. माधवन (R. Madhavan) आणि वेदांत माधवन (Vedaant Madhavan)
आर. माधवन हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. आर. माधवनचा मुलगा वेदांत हा चित्रपटसृष्टीपासून दूर राहून क्रीडा क्षेत्रात आपल्या कौशल्याने देशाचे आणि आपल्या वडिलांचे नाव परदेशात उंचावत आहे. वेदांत हा स्विमर आहे. अनेक वेळा आर. माधवन हा वेदांचे फोटो शेअर करुन त्याच्या क्रिडा क्षेत्रातील कार्याची माहिती चाहत्यांना देत असतो.
शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि आर्यन खान (Aaryan Khan)
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. आर्यनची 'स्टारडम' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आर्यनचा D'YAVOL X नावाचा फॅशन ब्रँड देखील आहे. शाहरुख आणि आर्यन ही बॉलिवूडमधील बाप-लेकाची प्रसिद्ध जोडी आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) आणि अभिनय बेर्डे (Abhinay Berde)
महेश कोठारे (Mahesh Kothare) आणि आदिनाथ कोठारे (Adinath Kothare)
इरफान खान (Irrfan Khan) आणि बाबिल खान (Babil Khan)
दिवंगत अभिनेता इरफान खान हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत होतं. इरफान यांच्या नॅचरल अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता इरफान यांचा मुलगा बाबिल खान हा देखील अभिनयक्षेत्रात काम करत आहे. बाबिलच्या नेटफ्लिक्सवरील कला या चित्रपटामधील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
संबंधित बातम्या
Father's Day 2023 : 'फादर्स डे' खास करायचाय? तुमच्या वडिलांसोबत घरबसल्या 'हे' सिनेमे नक्की पाहा