एक्स्प्लोर
'अभय' वेब सिरीजच्या शुटिंगदरम्यान कुणाल खेमू जखमी
अभिनेता कुणाल खेमू हा शुटिंगदरम्यान जखमी झाला आहे. एका सिनदरम्यान पाय घसरुन त्याच्या गुडघ्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. कुणाल 'अभय' या वेब सिरीजची शुटिंग करत असताना ही घटना घडली आहे.
मुंबई : अभिनेता कुणाल खेमू हा शुटिंगदरम्यान जखमी झाला आहे. सोमवारी एका सिनदरम्यान पाय घसरुन त्याच्या गुडघ्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. कुणाल 'अभय' या वेब सिरीजची शुटिंग करत असताना ही घटना घडली आहे.
'अभय' या वेब सिरीजच्या शुटिंगदरम्यान एका पात्राच्या पाठीमागे धावण्याचा दृष्य शुट होत होता. याचवेळी कुणालचा पाय घसरला आणि त्याच्या खाद्यांला आणि गुडघ्याला दुखापत झाली. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करत त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
या वेब सिरीजचे दिग्दर्शक केन घोष याबाबत सांगताना म्हणाले की, कुणाल खूप वाईट पद्धतीने घसरुन पडला. ज्यामुळे तो लांबपर्यंत घसरत गेला. आम्ही शुटिंग तात्काळ थांबवत डॉक्टरांना बोलावलं. त्याला खूप जास्त वेदना होत होत्या, असं दिग्दर्शक केन घोष म्हणाले. शिवाय त्या दिवसाची शुटिंग पुर्णपणे रद्द करण्यात आली होती, अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement