Drishyam 2 Collection Day 4 : 'दृश्यम 2' लवकरच गाठणार 100 कोटींचा टप्पा; जाणून घ्या आतापर्यंत कितीचा गल्ला?
Drishyam 2 : अजय देवगणच्या 'दृश्यम 2' या सिनेमाने रिलीजच्या चौथ्या दिवशी 10 कोटींची कमाई केली आहे.
Drishyam 2 Box Office Collection Day 4 : 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा बहुचर्चित सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. 'दृश्यम' हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमानंतर प्रेक्षक 'दृश्यम 2'ची प्रतीक्षा करत होते. आता हा सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे.
'दृश्यम 2' या सिनेमाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यश मिळाले. पहिल्या दिवशी या सिनेमाने 15.38 कोटींची कमाई करत सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झाली. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 21.59 कोटींची कमाई केली. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच्या कमाईकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या सिनेमाने तिसऱ्या दिवशी 21.17 कोटींची कमाई केली. तर सोमवारी रिलीजच्या चौथ्या दिवशी या सिनेमाने 10 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 74.14 कोटींची कमाई केली आहे.
'दृश्यम 2'ची कमाई :
- पहिला दिवस - 15.38 कोटी
- दुसरा दिवस - 21.59 कोटी
- तिसरा दिवस - 27.17 कोटी
- चौथा दिवस - 10 कोटी
- एकूण कमाई - 74.14 कोटी
View this post on Instagram
'दृश्यम 2' या सिनेमाची निर्मिती 50 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. रिलीजच्या अवघ्या चार दिवसांत या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. थरार-नाट्य असणाऱ्या या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) विजय साळगावकरच्या भूमिकेत आहे. अजयसह या सिनेमात तब्बू, श्रेया सरन आणि अक्षय खन्नादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
'दृश्यम 2' हा सिनेमात भारतात चार हजाराहून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. हा मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. हा सिनेमा सस्पेन्स, थ्रिल आणि क्लायमेक्सनं सजलेला आहे. अभिषेक पाठकने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या