एक्स्प्लोर
मला दीपिका पदूकोणचा एक्स बॉयफ्रेण्ड म्हणू नका : निहार पांड्या
दीपिकाचं लग्न झालं आहे आणि मी लवकरच लग्न करत आहे, त्यामुळे आता कोणी माझ्या नावासोबत दीपिकाचं नाव जोडू नये, अशी विनंती त्याने केली.
मुंबई : मला दीपिका पदूकोणचा एक्स बॉयफ्रेण्ड म्हणू नका, माझी स्वत:ची एक ओळख आहे, अशी नाराजी अभिनेता निहार पांड्याने एका मुलाखती दरम्यान व्यक्त केली आहे. दीपिकाचं लग्न झालं आहे आणि मी लवकरच लग्न करत आहे, त्यामुळे आता कोणी माझ्या नावासोबत दीपिकाचं नाव जोडू नये, अशी विनंती त्याने केली.
नुकतेच दीपिकाने अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्न केले आहे तर अभिनेता निहार पांड्या हा 15 फेब्रवारीला नीती मोहनशी लग्न करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दीपिका जेव्हा मुंबईत बॉलिवूडमध्ये करिअर करायला आली होती तेव्हा निहार आणि तिचे तीन वर्ष प्रेमसंबंध होते. दोघे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहायचे. मात्र त्यानंतर दोघे वेगळे झाले. परंतु तरीही निहारची ओळख दीपिकाचा एक्स बॉयफ्रेण्ड म्हणून दिली जाते.
त्यामुळे तो चांगलाच खवळला आहे. एका मुलाखती दरम्यान त्याला दीपिकाबद्दल प्रश्न विचारलं असता तो म्हणाला की, दीपिकाचं आता लग्न झालं आहे. ती तिच्या वैवाहिक जीवनात खूश आहे. माझ्या मनात तिच्याबद्दल कसलीही कटूता नाही. तिला मी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. अशा काळात प्रत्येक व्यक्तीला चांगला काळ आठवायला पाहिजे.
मला इतकंच वाटतं की माझ्या लग्नाबद्दल ज्या बातम्या येत आहेत त्यात माझी ओळख दीपिकाचा एक्स बॉयफ्रेण्ड म्हणून नाही तर स्वत:च्या नावाने व्हावी, असं निहार म्हणाला.
निहार पांड्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या 'मणिकर्णिका : द क्विन ऑफ झांसी' या सिनेमात दिसणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement