(Source: Poll of Polls)
Digambar Naik : दिगंबर नाईकचं 'बाई वाड्यातून जा' नवं नाटक रंगभूमीवर; रंगणार शुभारंभाचा प्रयोग
Digambar Naik : दिगंबर नाईकचं 'बाई वाड्यातून जा' हे नवं नाटक आता रंगभूमीवर आलं आहे.
Digambar Naik : आपल्या विनोदी टायमिंगने रसिकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता दिगंबर नाईक (Digambar Naik) सध्या एका बाईमुळे त्रस्त झाले आहेत. या बाईने त्यांना हैराण करून सोडलं आहे. बाई वाड्यातून जा असं तो म्हणतो आहे. ही बाई नेमकी कोण? ती वाड्यात का आली आहे? ती बाई वाड्यात राहणार? की दिगंबर नाईक तिला घालवण्यात यशस्वी होणार का ? हे पाहायचं असेल तर अभिनेता दिगंबर नाईक आणि 'बिगबॉस' फेम सोनाली पाटील यांचं आगमी 'बाई वाड्यातून जा' हे धमाल विनोदी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
'बाई वाड्यातून जा'चा रंगणार शुभारंभाचा प्रयोग
'बाई वाड्यातून जा' या नाटकाचा येत्या बुधवारी 29 मार्चला अत्रे रंगमंदिर कल्याण येथे शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन संकेत तांडेल यांचे आहे. या नाटकाची कथा एका जुन्या वाड्या भोवती फिरते. हा वाडा विकायचा असतो. तो विकताना एका बाईमुळे कसा गोंधळ उडतो? याची धमाल कथा ‘बाई वाड्यातून जा’ या नाटकातून पाहायला मिळणार आहे. अभिनेते दिगंबर नाईक आणि बिगबॉस फेम सोनाली पाटील या दोघांसमवेत या नाटकात भूषण घाडी, दीपा माळकर, भावेश टिटवळकर आणि अश्वजीत सावंतफुले हे कलाकार या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
View this post on Instagram
दिगंबर नाईक नाटकाबद्दल म्हणाला...
तब्बल चार वर्षांनी 'बाई वाड्यातून जा' या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवायला सज्ज झालेला दिगंबर नाईक या नाटकाबद्दल म्हणाला,"पुष्पगुच्छ जसा निरनिराळ्या फुलांनी समजलेला असतो तसंच हे नाटक सजलं आहे". धमाल मनोरंजन करणारं हे नाटक रसिकांना नक्की आवडेल असा विश्वास अभिनेते दिगंबर नाईक व्यक्त करतात.
तीन वेगळ्या जॉनरची गाणी या नाटकात असून गायक अश्मिक पाटील ,कविता राम यांचा स्वराज गाण्यांना लाभला आहे. संगीत सुशील कांबळे यांचे आहे. या नाटकाचं नेपथ्य वैभव पिसाट तर प्रकाशयोजना सौरभ शेठ यांची आहे. नेपथ्य निर्माण महेश धालवलकर यांचे आहे.
संबंधित बातम्या