Dharmendra : चक्की पीसिंग...पीसिंग... धर्मेंद्र यांचा भन्नाट व्हिडीओ; सायकल चालवत दळलं धान्य
Dharmendra : धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Dharmendra video On Social Media : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे त्यांच्या हटके स्टाइलमुळे आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतात. धर्मेंद्र सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकताच धर्मेंद्र यांनी एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ धर्मेंद्र यांच्या फार्म हाऊसमधला आहे. व्हिडीओमध्ये ते सायकलिंग करत धान्य दळताना दिसत आहेत. धर्मेंद्र यांनी हा व्हिडीओ शेअर करून त्याला भन्नाट कॅप्शन दिलं आहे.
धर्मेंद्र यांनी सायकलिंग करतानाचा व्हिडीओ शेअर करून त्याला कॅप्शन दिलं, 'साइकलिंग साइकलिंग साइकलिंग अँड...चक्की पीसिंग अँड पीसिंग अँड पीसिंग...'. शोले चित्रपटातील धर्मेंद्र यांच्या 'चक्की पीसिंग' या डायलॉगला त्यांच्या चाहत्यांची पसंती मिळाली होती. त्याच डायलॉगचे कॅप्शन धर्मेंद्र यांनी या व्हिडीओला दिलं आहे. सध्या धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
एका रिपोर्टनुसार धर्मेंद्र हे लवकरच ‘अपने 2’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटामध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत सनी, बॉबी ही त्यांची मुलं आणि नातू करण प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच लवकरच धर्मेंद्र यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंह आणि शबाना आजमी हे कालकार महत्वाची भूमिका साकारणार आहेत.
संबंधित बातम्या
Actor Dharmendra First Car: धरम पाजींनी जपून ठेवलीये पहिली कार; किंमत ऐकाल तर व्हाल अवाक्
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha























