Dhanush: डोक्यावर टोपी, शर्ट आणि पँट, असिस्टंटच्या लग्नात सिंपल लूकमध्ये पोहोचला धनुष; नवविवाहित जोडप्यासोबत काढले फोटो
Dhanush: धनुषनं त्याच्या असिस्टंटच्या लग्नामध्ये हजेरी लावली. नुकताच धनुषचा लग्नसोहळ्यामधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
![Dhanush: डोक्यावर टोपी, शर्ट आणि पँट, असिस्टंटच्या लग्नात सिंपल लूकमध्ये पोहोचला धनुष; नवविवाहित जोडप्यासोबत काढले फोटो Dhanush attends assistant's wedding in jeans and cap video viral Dhanush: डोक्यावर टोपी, शर्ट आणि पँट, असिस्टंटच्या लग्नात सिंपल लूकमध्ये पोहोचला धनुष; नवविवाहित जोडप्यासोबत काढले फोटो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/18/6ac931a8ad78c66c0f615cd578e0efb51695036300128259_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dhanush: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता धनुष (Dhanush) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. नुकताच धनुषचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये धनुष हा त्याच्या असिस्टंटच्या लग्नामध्ये गेलेला दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमधील धनुषच्या सिंपल लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
निळ्या रंगाची जीन्स आणि डोक्यावर कॅप आणि शर्ट अशा लूकमध्ये धनुष लग्ना सोहळ्यामध्ये पोहोचला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, धनुष हा लग्न सोहळ्यात स्टेजवर जातो. त्याला पाहिल्यानंतर नवविवाहित जोडपे आनंदी होते. त्यानंतर धनुष हा नवविवाहित जोडप्यासोबत फोटो काढतो. लग्नसोहळ्यातील व्हायरल व्हिडीओला कमेंट्स करुन अनेकांनी धनुषच्या या साधेपणाचे कौतुक केले आहे.
लग्नसोहळ्याला धनुषसोबतच केन करुणसने देखील हजेरी लावली होती. धनुष आणि केन यांनी 'असुरन' चित्रपटात एकत्र काम केले आहे.
पाहा व्हिडीओ:
தனது உதவியாளர் ஆனந்த் திருமண வரவேற்ப்பு நிகழ்ச்சியில் திடீரென வந்து வாழ்த்திய தலைவர் @dhanushkraja sir ❣️🔥🙏 #CaptainMiller #Dhanush pic.twitter.com/Lep0bzGyNR
— Dhanush Trends ™ (@Dhanush_Trends) September 16, 2023
'सेलिब्रिटींना त्यांच्या चाहत्यांना एवढा प्रेम आणि पाठिंबा दाखवणे हे आश्चर्यकारक आहे. त्यामुळेच धनुषचा चाहता वर्ग इतका मोठा आहे.', अशी कमेंट व्हायरल व्हिडीओला एका चाहत्यानं केली.
धनुषचे चित्रपट
धनुषच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'कॅप्टन मिलर' आणि 'तेरे इश्क में' हे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. दिग्दर्शक आनंद एल राय यांनी 'तेरे इश्क में' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच 'कॅप्टन मिलर' अरुण माथेश्वरन यांनी 'कॅप्टन मिलर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'कॅप्टन मिलर' हा चित्रपट 15 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे.
धनुषच्या 'कॅप्टन मिलर' या चित्रपटात धनुषसोबतच सुदीप किशन, नासर, एलंगो कुमारवेल, एडवर्ड सोनेनब्लिक, विजी चंद्रशेखर, निवेदिथा सतीश, जॉन कोककेन, विनोथ किशन, बाला सरवनन, सुमेश मूर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. धनुष हा अतरंगी रे, रांझणा या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच त्यानं द ग्रे-मॅन या हॉलिवूड चित्रपटात देखील काम केलं आहे. धनुष त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)