एक्स्प्लोर

इफ्फीची प्रतिनिधी नोंदणी सुरु, यंदा स्पोर्ट्स सिनेमांना विशेष विभाग

20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित इफ्फीमध्ये आतापर्यंत 64 देशांनी सहभाग नोंदवला आहे. यंदा क्रीडा विषयावरील चित्रपटांसाठी विशेष विभाग करण्यात आला आहे.

पणजी: 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीच्या प्रतिनिधी नोंदणीला काल सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित इफ्फीमध्ये आतापर्यंत 64 देशांनी सहभाग नोंदवला आहे. यंदा क्रीडा विषयावरील चित्रपटांसाठी विशेष विभाग करण्यात आला आहे. गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत इफ्फीची माहिती दिली.  इफ्फीचा उद्घाटन आणि समारोप सोहळा बांबोळी येथील श्यामाप्रसाद स्टेडियममध्ये होणार आहे. उद्घाटनाच्या सिनेमाचे प्रदर्शन कला अकादमीमध्ये केले जाणार आहे. इफ्फी स्थळांच्या सजावटीची जबाबदारी प्रख्यात गोमंतकीय कला दिग्दर्शक भूपाल रामनाथकर यांच्या कडे सोपवण्यात आली आहे.रामनाथकर हे गोवा मनोरंजन संस्थेला सजावटीसाठी सर्वतोपरी मदत आणि मार्गदर्शन करणार आहेत. इफ्फीची प्रतिनिधी नोंदणी सुरु, यंदा स्पोर्ट्स सिनेमांना विशेष विभाग यंदा कंट्री फोकस विभागासाठी इस्रायलची निवड करण्यात आली आहे. इस्रायलचे 6 ते 7 सिनेमा या विभागात इफ्फी प्रतिनिधींना पहायला मिळणार आहेत. सिनेमा ‘ऑफ द वर्ल्ड’मध्ये आतापर्यंत 64 देशांनी सहभाग नोंदवला असून हा आकडा आणखी वाढू शकतो, असे तालक यांनी यावेळी सांगितले. होमेज विभागात यावर्षी शशी कपूर,श्रीदेवी आणि विनोद खन्ना यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. या विभागात तिघांचे निवडक सिनेमे दाखवले जाणार असून, या विभागाच्या उद्घाटनासाठी कपूर कुटुंबीयांपैकी कोणी तरी यावं, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे तालक यांनी सांगितले. यंदापासून क्रीडा विभाग सुरु करण्यात आला असून खेळाशी संबंधित 6 ते 7 सिनेमे त्याअंतर्गत प्रदर्शित केले जाणार आहेत. इफ्फी प्रतिनिधींव्यतिरिक्त इतर सिनेमाप्रेमींना सिनेमा जगताचा आस्वाद घेता यावा, यासाठी साग मैदानावर बायोस्कोप व्हिलेजची निर्मिती केली जाणार आहे. तेथे 4 तंबू थिएटर उभारून विविध सिनेमे दाखवले जाणार आहेत. त्यात मुलांसाठी, त्याचबरोबर मराठी आणि भारतीय सिनेमे प्रदर्शित केले जाणार आहेत. वातानुकूलित 150 आसन क्षमता असलेल्या थिएटर्स मध्ये 5.1 साउंड सिस्टीमसह सिनेमा बघता येणार आहेत. याशिवाय 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान कट्यावर अनेक सिनेमा सेलिब्रिटीं सोबत गप्पाचे फड रंगणार आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Embed widget