Chitra Wagh: 'आज जर हिला थांबवलं नाही तर, अजून दहा जणी...; चित्रा वाघ यांचे उर्फीवर पुन्हा ताशेरे
आज जर हिला (Urfi Javed) थांबवलं नाही तर, अजून दहा जणी नागड्या फिरतील, अशा शब्दात चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीला पुन्हा एकदा सुनावलं आहे.
Chitra Wagh: भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यातील वादाचा दररोज नवा अंक पाहायला मिळतोय. चित्रा वाघ यांनी उर्फीवर पुन्हा एकदा टीका केली आहे. आज जर हिला थांबवलं नाही तर, अजून दहा जणी नागड्या फिरतील, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी उर्फीला पुन्हा एकदा सुनावलं आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
औरंगाबादमध्ये एबीपी माझासोबत संवाद साधताना चित्रा वाघ म्हणाल्या,'महाराष्ट्रातील एका महिलेनं मला उर्फीचा एक व्हिडीओ पाठवला. त्या महिलेच्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. त्यांनी मला मेसेज पण केले. माझा या क्षेत्राची काहीही संबंध नाहीये. मला जर तुम्ही विचारलं की, बॉलिवूडबाबत तर मला सांगतला येणार नाही. जेव्हा त्या महिलेनं उर्फीच्या व्हिडीओच्या लिंक्स पाठवल्या, तेव्हा मी पाहिलं की, एक बाई उघड्या नागड्या परिस्थितीमध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरतीये. बाकीचे फोटो पाहिले तर ते आणखी भयानक होते. कुठलाही धर्म असे कपडे घालण्याची शिकवण देत नाही.'
'उर्फीमुळे विकृती वाढते. विरोध व्यक्तीला नाही तर त्या व्यक्तीच्या प्रकृतीला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मुंबईच्या रस्त्यावरचा नंगानाच थांबला नाही तर त्याचं लोण औरंगाबादमध्येही पसरेल. जिन्स पॅन्ट घालणं आणि उर्फी जे घालते ते वेगळं आहे. मी एवढी निर्लज्ज बाई पाहिली नाही. आम्ही स्वैराचाराच्या नावावर डोळे बंद करुन बसणार नाही. उर्फीला जेलमध्ये टाकणं हा माझा मोटो नाहीये. इतर प्रश्न देखील आहे, त्यावर देखील आम्ही काम करत आहोत. आज जर हिला थांबवलं नाही तर, अजून दहा जणी नागड्या फिरतील.'
चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती.
कोण आहे उर्फी जावेद?
अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: