Godfather: चिरंजीवीचा 'गॉडफादर' ओटीटीवर; 'या' प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट
ज्यांनी चिरंजीवीचा 'गॉडफादर' (Godfather) हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिला नाही, ते प्रेक्षक आता हा चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहू शकतात.
![Godfather: चिरंजीवीचा 'गॉडफादर' ओटीटीवर; 'या' प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट chiranjeevis godfather is streaming on ott Netflix Godfather: चिरंजीवीचा 'गॉडफादर' ओटीटीवर; 'या' प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/19/43879af836cef837b9c7f7857b079b351668835390887259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Godfather: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवीचा 'गॉडफादर' (Godfather) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा चित्रपट 5 ऑक्टोबर प्रेक्षकांच्या भेटीस आला. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. ज्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिला नाही, ते प्रेक्षक आता हा चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहू शकतात.
गॉडफादर हा चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. तेलगू आणि हिंदी या भाषेमध्ये तुम्ही हा चित्रपट ओटीटीवर पाहू शकता. या चित्रपटाचं दिग्दर्शन मोहन राजा यांनी केलं आहे.
चित्रपटाची तगडी स्टार कास्ट
चिरंजीवी यांच्यासोबतच सत्यदेव, नयनतारा, ब्रह्माजी आणि सलमान खान यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. अभिनेता जिरंजीवीनं या चित्रपटात ब्रह्मा ही भूमिका साकारली आहे. तर थमन एस यांनी या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन आहे. कोनिडेला प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या तेलगू व्हर्जनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली पण या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन प्रेक्षकांच्या पसंतीस पडले नाही.
View this post on Instagram
'गॉडफादर' हा चित्रपट मल्याळम ब्लॉकबस्टर 'लुसिफर' चा अधिकृत रिमेक आहे, ज्यात मोहनलाल, पृथ्वीराज सुकुमारन, विवेक ओबेरॉय, मंजू वॉरियर आणि टोविनो थॉमस यांच्या प्रमुख भूमिका साकारली. याचित्रपटाचे दिग्दर्शन पृथ्वीराज सुकुमारन यांनी केले होते. 100 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली, असं म्हटलं जात आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)