(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KGF 2 On OTT : बहुचर्चित 'केजीएफ 2' आता घरबसल्या पाहा; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
KGF 2 : यशच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यशचा 'केजीएफ 2' आता प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
KGF 2 : साऊथ सुपरस्टार यशचा (Yash) 'केजीएफ 2' (KGF 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या हिंदी वर्जनने 400 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर जगभरात या सिनेमाने 1000 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे. सिनेमागृहात सध्या हा सिनेमा धुमाकूळ घालतो आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.
अॅमेझॉन प्राइमवर होणार प्रदर्शित
यशचा 'केजीएफ 2' हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा सिनेमा प्रेक्षकांना पाच भाषेत पाहायला मिळणार आहे. 'केजीएफ 2' हा सिनेमा हिंदीतील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे.
केजीएफ 2' सिनेमा पाच भाषेत प्रदर्शित
'केजीएफ 2' या सिनेमात यश, संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. प्रशांत नील यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा कन्नड, तामिळ, तेलुगू, हिंदी आणि मल्याळम अशा पाच भाषेत प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
'केजीएफ 2' सिनेमात यश मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'पुष्पा'नंतर 'केजीएफ 2' या दाक्षिणात्य सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन एक महिना झाल्यानंतरदेखील हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
'केजीएफ 2'ची गाडी बॉक्स ऑफिसवर सुसाट
'केजीएफ 2' सिनेमाने पहिल्या आठवड्यात 59.84 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने 32.65 कोटींची कमाई केली आहे. तर तिसऱ्या आठवड्यात या सिनेमाने 21.30 कोटींची कमाई केली आहे. तर चौथ्या आठवड्यात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. चौथ्या आठवड्यात या सिनेमाने 127.12 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांना चांगलाच नफा मिळाला आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या