एक्स्प्लोर
बच्चे कंपनीसाठी बनवलेल्या 'द जंगल बुक'ला 'यूए' प्रमाणपत्र
मुंबई : 'द जंगल बुक'... ज्याची फक्त चिमुकल्यांनाच नव्हे तर त्यांच्या मम्मी-पप्पांना देखील मोठी प्रतीक्षा होती, तो मोगली पुन्हा अवतरला आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मोगलीने टेलीव्हिजन स्क्रीनवरुन सिनेमागृहातल्या मोठ्या पडद्यावर झेप घेतली आहे. मात्र जगभरातल्या बच्चे कंपनीला भूरळ पाडणाऱ्या 'द जंगल बुक' सिनेमाला 'यूए' प्रमाणपत्र देण्याचा संकुचितपणा भारतीय सेन्सर बोर्डाने दाखवला आहे.
आता सेन्सॉर बोर्डाला मोगलीचा धाडसीपणा खटकला, की बगिराचा जिगरबाजपणा? शेरखानच्या डरकाळीने सेन्सॉर बोर्डाच्या मनात धडकी भरली, की रक्षा आणि मोतीचा दयाळूपणा त्यांना सहन झाला नाही? पण लहान मुलांसाठी बनवण्यात आलेल्या दिग्दर्शक जॉन फेवरुंच्या 'द जंगल बुक'ला 'यूए' प्रमाणपत्र मिळाल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. चित्रपटातील 3D इफेक्टमुळे मुलं घाबरण्याची शक्यता आहे, अशी न पटणारी सबब सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी दिली आहे.
रिव्ह्यू : द जंगल बुक
सर्वसाधारणपणे भारतीय सेन्सर बोर्डाकडून कोणत्याही चित्रपटाला चार प्रकारचे प्रमाणपत्र देण्यात येतात. 'ए' प्रमाणपत्र मिळालेला चित्रपट फक्त 18 वर्षांवरील प्रेक्षकांनाच पाहण्याची परवानगी असते. 'एस' प्रमाणपत्र मिळालेला चित्रपट पाहण्यासाठी विशिष्ट प्रेक्षक वर्गाला बंदी घालण्यात येते. 'यू' प्रमाणपत्र मिळालेला चित्रपट कोणत्याही वयोगटातील प्रेक्षकांना पाहता येतो. तर 'यूए' प्रमाणपत्र मिळालेला चित्रपट पाहण्यासाठी 12 वर्षांखालील मुलांना पालकांची परवानगी घेणं आवश्यक असतं. त्यामुळे पालकांची परवानगी नसेल तर चिमुकल्यांना 'द जंगल बुक' सारख्या अद्भुत कलाकृतीचा आनंद घेता येणार नाही. एरवी कुटुंबियांसोबत बसून पाहता येणार नाही अशा आक्षेपार्ह चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाकडून डोळेझाकपणे यू सर्टिफिकेट दिलं जातं. मात्र चिमुकल्यांसाठी बनवण्यात आलेल्या 'द जंगल बुक' या चित्रपटाला 'यू' ऐवजी 'यूए' प्रमाणपत्र देण्याचा संकुचितपणा भारतीय सेन्सॉर बोर्डाने दाखवला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement