एक्स्प्लोर
Advertisement
'बार बार..'मधून सविता भाभीचा संदर्भ काढा : सेन्सॉर बोर्ड
मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या 'बार बार देखो' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने UA प्रमाणपत्र दिलं आहे. मात्र निर्मात्यांचा त्रास इतक्यात थांबलेला नाही. 'सविता भाभी'चा संदर्भ चित्रपटातून वगळण्याचं फर्मान सेन्सॉर बोर्डाने सोडलं आहे.
ब्रा दाखवणारा एक सीनही बार बार देखो या चित्रपटातून काढण्यास सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना सांगितलं आहे. 'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार पॉर्नोग्राफिक कारटून कॅरेक्टर असलेल्या सविता भाभीचा संदर्भही सिनेमातून वगळण्यास सुचवलं आहे.
कतरीनाचे 'ते' गाणे पाहणाऱ्यांची संख्या तब्बल 5 कोटींवर
सेन्सॉर बोर्डाच्या अरेरावीमुळे चित्रपटाच्या निर्मात्यांचा संताप झाला आहे. 'महिलांच्या अंतर्वस्त्राबाबत चारचौघात बोललं जात नसतानाच्या काळात आपण जगतोय का?' असा सवाल उपस्थित केला जात आहे.‘बार बार देखो’चंही आता ‘सैराट’स्टाईल प्रमोशन
'1995 मध्ये काजोल आणि शाहरुखच्या डीडीएलजेमधला ब्रा सीन गाजला होता. त्यामुळे 20 वर्षांनी या सीनमुळे प्रेक्षक अवघडण्याची शक्यताच शून्य आहे. विशेष म्हणजे सिनेमाची दिग्दर्शकच एक महिला आहे.' असं चित्रपटाशी संबंधित एका व्यक्तीने म्हटल्याचं 'बॉलिवूड हंगामा'ने लिहिलं आहे. नित्या मेहरा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.'बार-बार देखो'च्या अडीच मिनिटाच्या ट्रेलरमध्येच 5 किसिंग सीन
सेन्सॉर बोर्डाने उडता पंजाब चित्रपटालाही अनेक कट्स सुचवल्यानंतर वादंग माजला होता. निर्माते-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचे खटके उडाले होते. त्यानंतर एका कटसह सिनेमाला प्रमाणपत्र देण्यात आलं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement