एक्स्प्लोर
सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली
‘पद्मावती’ सिनेमावरुन सुरु असलेले वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. देशभरातील विविध संघटना पद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करत असतानाच, सेन्सॉर बोर्डानेही तांत्रिक कारणं पुढे करत, सिनेमाची कॉपी परत पाठवली आहे.
मुंबई : ‘पद्मावती’ सिनेमावरुन सुरु असलेले वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. देशभरातील विविध संघटना पद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करत असतानाच, सेन्सॉर बोर्डानेही तांत्रिक कारणं पुढे करत, सिनेमाची कॉपी परत पाठवली आहे.
केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड (सीबीएफसी)च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनेमाची कॉपी सर्टिफिकेशनसाठी गेल्याच आठवड्यात सीबीएफसीकडे आली. यासाठी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी असता, त्यातील काही कागदपत्र अपूर्ण असल्याने सिनेमाची कॉपी परत पाठवण्यात आली. कागदपत्रांची योग्य पूर्तता करुनच सिनेमाची कॉपी पाठवण्यास निर्मात्यांना सांगिण्यात आल्याचं सीबीएफसीच्या सूत्रांनी सांगितलं.
त्यामुळे आता कागदपत्रांची योग्य पूर्तता झाल्यानंतरच सिनेमाच्या कॉपीचं परीक्षण केलं जाईल, असंही सूत्रांनी सांगितलं. पण या अर्जामध्ये काय त्रुटी होत्या हे सांगण्यास सीबीएफसीने स्पष्ट नकार दिला आहे.
सेन्सॉर बोर्डाने तांत्रिक कारण पुढे करत सिनेमाची कॉपी परत पाठवली आहे. पण गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिनेमाचं प्रदर्शन पुढं ढकलण्यात येत असल्याची चर्चा सध्या जोरदार रंगत आहे.
वायकॉम 18 मोशन पिक्चर्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर्स अजीज अंधारे यांनी सांगितलं की, एक लहान त्रूटीमुळे ही कॉपी परत पाठवण्यात आली. ती लवकरच पूर्ण करुन सेन्सॉर बोर्डाकडे परीक्षणासाठी पाठवली जाईल. पण सिनेमा प्रदर्शनासंदर्भात पसरवण्यात येणाऱ्या सर्व अफवा निराधार असून, येत्या डिसेंबरमध्येच सिनेमा रिलीज होईल, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, पद्मावती सिनेमाविरोधात शुक्रवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या सिनेमातून महाराणी पद्मावतींची व्यक्तीरेखा चुकीच्या पद्धतीने दाखवली जात असल्याचा आरोप होत आहे. तसेच सिनेमातील आक्षेपार्ह दृश्ये हाटवण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.
संबंधित बातम्या
'पद्मावती'चं तिकीट काढण्याआधी विमा काढून ठेवा, फेसबुकवरुन धमकी
…तर दीपिका पादूकोणचं नाक कापू : करणी सेना
‘पद्मावती’ला कोणीही रोखू शकणार नाही: दीपिका पादूकोण
पद्मावती’ वाद : संपूर्ण बॉलिवूड भन्साळींच्या समर्थनार्थ मैदानात
‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर
एक दिल.. एक जान.. ‘पद्मावती’तील प्रेम-विरह गीत रीलिज
‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
‘पद्मावती’च्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
दीपिकाचा जबरदस्त लूक, ‘पद्मावती’चं नवं पोस्टर रिलीज
रणवीरच्या खिल्जीमुळे दीपिका अस्वस्थ, ब्रेकअपची चर्चा
रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement