Mahesh Manjrekar : 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' सिनेमामुळे महेश मांजरेकरांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल
Mahesh Manjrekar : 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' या सिनेमामुळे दिग्दर्शक महेश मांजरेकर वादात अडकले आहेत.
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महेश मांजरेकरांच्या 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) या सिनेमात अल्पवयीन मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप महेश मांजरेकरांवर करण्यात आला होता.
'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' या सिनेमात लहान मुलांच्या आक्षेपार्ह चित्रीकरणाप्रकरणी माहिम पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आले आहे. आयपीसी कलम 292, 34 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 14 आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 आणि 67-ब या कलमांखाली महेश मांजरेकर यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील पोक्सो कोर्टानं चौकशी करून आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार माहिम पोलिसांनी चौकशीअंती आज एफआयआर दाखल केले आहे.
चित्रपटावर नाराजी
'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' या सिनेमात किशोरवयीन मुलांच्या भावविश्वाची एक वेगळी कथा प्रेक्षकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कथेची पार्श्वभूमी गिरणी संप, गिरणगावातील चाळींशी संबंधित होती. किशोरवयीन मुलाचे नात्यातील प्रौढ महिलेशी संबंध सिनेमात दाखवण्यात आले होते. यावर गिरणगावातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. महेश मांजरेकर यांच्या चित्रपटामुळे गिरणगाव आणि चाळीतील मुलांबाबत दिशाभूल होत असल्याचा मुद्दा अनेकांनी मांडला होता. त्यामुळेच मुंबई पोलिसांनी महेश मांजरेकरां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या
Sonu Nigam : सोनू निगमने बीएमसी प्रमुख इक्बाल सिंघ चहल यांच्या चुलत भावावर केला गैरवर्तनाचा आरोप
Taarak Mehta On Netflix : 'तारक मेहता का छोटा चष्मा' येणार नेटफ्लिक्सवर
Gangubai Kathiawadi : आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाविरोधात आमदार आणि स्थानिक हायकोर्टात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha