एक्स्प्लोर

Gangubai Kathiawadi : आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाविरोधात आमदार आणि स्थानिक हायकोर्टात

Gangubai Kathiawadi : आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाच्या शीर्षकावर आक्षेप घेणाऱ्या दोन याचिकांवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

Gangubai Kathiawadi : निर्माता आणि  दिग्दर्शक संजय लीला भंसाली (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) चित्रपटामागे लागलेले शुक्लकाष्ठ काही संपता संपत नाहीत. येत्या शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होणार असताना आता तो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत त्याविरोधात दोन स्वतंत्र याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या असून त्यावर बुधवारी तातडीने सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. 

आलिया भट्टची (Alia Bhatt) मुख्य भूमिका असलेला 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातून दक्षिण मुंबईतील 'कामाठीपुरा' या परिसराचा संदर्भ काढून टाकण्याची मागणी करत या परिसरातील 55 स्थानिक रहिवाश्यांच्यावतीनं श्रद्धा सुर्वे या महिलेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील दृश्यांवरून कामाठीपुरा परिसराची प्रतिष्ठा मलिन होत आहे. चित्रपटाने संपूर्ण परिसर 'रेड-लाइट हब' म्हणून चित्रित करून त्या परिसराला अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांची, विशेषतः महिलांची प्रतिमा मलीन होण्याची भीती आहे, तेव्हा यातील कामाठिपुरा हा शब्द वगळावा आणि अन्य, तत्सम शब्द वापरावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी पार पडणार आहे.

तर दुसरीकडे, काँग्रेसचे स्थानिक आमदार अमीन पटेल यांनीही यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या परिसरातील अनेक सामाजिक संस्थाकडून या चित्रपटावर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. तसेच संपूर्ण कामाठीपुरा हा 'रेड-लाईट' परिसर असल्याचं सांगण्यात आलं असून गंगुबाई एक वैश्या आणि माफीया क्वीन होती व संपूर्ण परिसरात तिची दहशत असल्याचं चित्रित करण्यात आल्याबद्दल संस्थांनी आक्षेप घेतल्याचंही आमदारांचं म्हणणं आहे. त्यावरही बुधवारी मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. आलिया भट आणि अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा येत्या 25 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

संबंधित बातम्या 

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचा नवा अवतार, शिव तांडव स्त्रोतम 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Sher Shivraj : शिवरायांची कीर्ती पुन्हा दुमदुमणार! फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंडनंतर 'शेर शिवराज' येणार रुपेरी पडद्यावर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेरVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget