(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Taarak Mehta On Netflix : 'तारक मेहता का छोटा चष्मा' येणार नेटफ्लिक्सवर
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेचे आतापर्यंत 3300 हून अधिक भाग पूर्ण झाले आहेत.
Taarak Mehta On Netflix : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka Ooltah Chashmah) ही मालिका 24 फेब्रुवारी 2022 पासून 'तारक मेहता का छोटा चष्मा' (Taarak Mehta Ka Chota Chashmah) या नावाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जाणार आहे. ही मालिका 'अॅनिमेटेड' स्वरूपात असणार आहे.
अॅनिमेटेड मालिकेत गोकुळधाम सोसायटीतीत सर्व पात्रे अनोख्या कॉमिक अवतारात दाखवली आहेत. त्यामुळे लहान मुलांमध्येदेखील या मालिकेची क्रेझ आहे. असित मोदी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे निर्माते आहेत.
असित मोदी म्हणाले, मनोरंजनासोबत समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी 'तारक मेहता का छोटा चष्मा' ही मालिका ओटीटीवर घेऊन येण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ओटीटीमुळे 'तारक मेहता का छोटा चष्मा' मालिकेचा प्रेक्षकवर्गदेखील वाढेल.
View this post on Instagram
'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात कौटुंबीक आणि विनोदी मालिका म्हणून आपलं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेचे आतापर्यंत 3300 हून अधिक भाग पूर्ण झाले आहेत. तसेच मराठीत 'गोकुळधामची दुनियादारी' आणि तेलुगुमध्ये 'तारक मामा आयो रामा' या नावाने मालिका प्रसारित होत आहे.
संबंधित बातम्या
Jhund Trailer : बिग बींचा स्वॅग, आकाशचा लफडा.. 'झुंड'चा ट्रेलर लॉंच
Gangubai Kathiawadi : आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाविरोधात आमदार आणि स्थानिक हायकोर्टात
Farhan Akhtar, Shibani Dandekar : 'रॉयल वेडिंग'; शिबानी-फरहाननं शेअर केले लग्न सोहळ्यातील खास फोटो
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha